माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यावर किती विश्वास ठेवावा? संमेलनाध्यक्ष भवाळकरांचा पंतप्रधान मोदींना टोला

माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यावर किती विश्वास ठेवावा? संमेलनाध्यक्ष भवाळकरांचा पंतप्रधान मोदींना टोला

Tara Bhavalkar on PM Modi in Akhil Bharatiya Marathi Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sammelan) उद्घाटन दिल्लीमध्ये पार पडले. यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी असं म्हणत पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली? खासदार कोल्हेंनी थेट पुरावेच आणले

या उत्पादन करणारा सर्वात महत्त्वाचा दुसरा वर्ग आहे तो म्हणजे स्त्री. कोणत्याही जीवाला आपला वंश टिकवायचा असेल तर स्त्री आवश्यक असते. मात्र तिला दुय्यम स्थान दिलं जातं . अशाच विचारसरणीतून आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा विषय वेगळा आहे. पण आमच्या संत कवयित्रींनी याचा तेराव्या 14व्या शतकातच भांडाफोड केला. असं म्हणत स्त्री साहित्यिकांबद्दल बोलताना भवाळकर यांनी नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

VIDEO : हातात हात पकडून दीपप्रज्वलन, मग थेट मोदींनींच भरला पवारांसाठी पाण्याचा ग्लास; दिल्लीत नेमकं काय घडलं?

कारण गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्य बद्दल माहिती दिली होती. त्यामध्ये एका प्रश्नावर बोलताना ते म्हटले होते की, मी माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. तर मला ईश्वराने त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी पाठवलं आहे. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका देखील झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा थेट मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भावाळकर यांनी देखील यावरून मोदींना नाव न घेता टोला लगावला आहे.

दिल्लीत PM मोदींचं मराठीत भाषण….

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sammelan) उद्घाटन दिल्लीमध्ये पार पडले. यावेळी देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वातांना माझा नमस्कार,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरूवात केली. दिल्लीमध्ये (Delhi) या साहित्य संमेलनाचं आयोजन होतंय. एक भाषा किंवा एका राज्यापुरतं हे आयोजन नाहीये.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube