‘इंडिया आघाडी फक्त लोकसभेपुरतीच होती’, आरजेडी नेते तेजस्वी यादवांचे मोठे विधान

‘इंडिया आघाडी फक्त लोकसभेपुरतीच होती’, आरजेडी नेते तेजस्वी यादवांचे मोठे विधान

Tejashwi Yadav: इंडिया आघाडीत (India Alliance) काँग्रेस पक्ष (Congress) आता एकाकी पडू लागलाय. मित्रपक्षांनी काँग्रेसपासून दुरावा बाळगायला सुरुवात केली. इंडिया आघाडीतील (India Alliance) दोन प्रमुख मित्रपक्षांनी काँग्रेसपासून दुरावा राखत आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) पाठिंबा जाहीर केलाय. यात तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा समावेश आहे. त्यामुळं इंडिया आघाडीत फुट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच आता आरजेडी नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या वक्तव्याने इंडिया आघाडी फुटण्याच्या चर्चांना तोंड फुटलं.

Pritish Nandy Death : मोठी बातमी! प्रसिद्ध कवी, चित्रपट निर्माते प्रितिश नंदी यांचे निधन 

काय म्हणाले तेजस्वी यादव?

तेजस्वी यादव यांनी बक्सरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की, इंडिया आघाडी बनवत असतांना असं ठरलं होतं की, ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही, असं ते म्हणाले. RJD दिल्ली निवडणूक लढवणार का? असा सवाल केला असता तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही दिल्लीची निवडणूक लढवणार की नाही हे अजून ठरवलेले नाही. पुढंचं पुढं पाहू. पण, आम्ही बिहारमध्ये एकत्र असू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महाकुंभ मेळ्यात शाही स्नान कधी होणार? एका क्लीकवर जाणून घ्या सर्व तारखा 

इंडिया आघाडीत बिघाडी?
गेल्या काही महिन्यांपासून इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून काँग्रेसप्रती नाराजीचे सूर उमटत आहेत. दोन्ही राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल असमाधान व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर नेतृत्व करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशातील महत्वाचा पक्ष असलेल्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानेही काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, बिहारमध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुका आहेत. येथे आरजेडी आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. अशातच आता तेजस्वी यादव यांनी इंडिया आघाडी केवळ लोकसभेपुरती होती, असं विधान केलं. त्यामुळं कॉंग्रेसचे टेन्शन वाढले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube