दिल्ली अन् लाल किला नाही तर आयोध्येतील राम मंदिर…; स्फोट घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती
दिल्लीतील स्फोट घटनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली. या दहशतवाद्यांना दिल्लीमध्ये स्फोट घडवायचा नव्हता. यांचे टार्गेट वेगळेच होते.
दिल्ली लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर पूर्ण देश हादरला आहे. (Blast) देशभरातील अनेक महत्वाची शहरांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे सगळं सुरू असताना या घटनेत आता नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. काही दिवसांपासून या स्फोटाची योजना आखली जात होती असंही प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्याचबरोबर दिल्लीतील लाल किल्ला हे त्यांचं टार्गेट नसून त्यांचं टार्गेट अयोध्या आणि वाराणसी होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विविध ठिकाणांहून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. दहशतवाद्यांनी अयोध्या आणि वाराणसीतील राम मंदिराला टार्गेट केले होते. ज्याचे एक मॉड्यूल तयार केले होते. तपासात हे स्पष्ट झाले की, या दहशतवाद्यांना दिल्ली नव्हे तर अयोध्येत स्फोट घडवायचा होता. अटक करण्यात आलेली शाहीन हिने अयोध्येत स्लीपर मॉड्यूल सक्रिय केले होते.
धक्कादायक! दिल्लीतील स्फोटानंतर पाकिस्तानी नागरिकांची गूगल सर्च हिस्ट्री समोर; पाहा संपूर्ण लिस्ट
आतापर्यंतच्या तपासातून असे दिसून येते की, स्फोटकांमध्ये कोणताही टायमर नव्हता. हा स्फोट घाईघाईत झाला. दहशतवाद्यांनी चाैकशीत सांगितले की, त्यांना स्फोट जास्तीत जास्त लोक असलेल्या ठिकाणी उडवायचा होता. सुरक्षा एजन्सींसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे की, उर्वरित 300 किलो अमोनियम नायट्रेट त्यांना जप्त करायचा आहे. याकरिता दहशतवाद्यांकडून कसून चौकशी केली जात आहे. दहशतवाद्यांनी हे लपून ठेवले आहे.
माहितीनुसार, एजन्सीने आतापर्यंत 2,900 किलो स्फोटके जप्त केली आहेत. हे स्फोटके जप्त करण्यासाठी सतत छापेमारी केली जात आहे. दिल्लीत स्फोट करण्यात आलेल्या i-20 कार दिल्लीत कुठे कुठे गेली होती, याचा शोध घेतला जात आहे. गाडीत स्फोटके नेमकी कुठे भरण्यात आली, याचा शोध सुरू आहे. तीन तास जवळपास लाल किल्ल्याजवळीला पार्किंगमध्ये ही गाडी उभी होती.
