त्यांनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारली; ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवरून मोदींचा विरोधकांना टोला

त्यांनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारली; ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवरून मोदींचा विरोधकांना टोला

They shot themselves in the foot; Modi hits out at the opposition over the discussion on Operation Sindoor : आज 5 ऑगस्ट रोजी भाजपच्या नेतृत्त्वातीव एनडीए आघाडीची संसदीय बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर संसदेत करण्यात आलेल्या चर्चेवरून विरोधकांना टोला लागवला.

सीएमएफआरआय अहवालात आनंदाची बातमी, महाराष्ट्रात मत्स्योत्पादन 47 टक्क्यांनी वाढले

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना संबोधित करताना ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हा देशाच्या सैन्याचा सन्मान आहे. त्यामुळे ते देशातील लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर संसदेत करण्यात आलेल्या चर्चेवरून विरोधकांना टोला लागवला. मात्र विरोधकांनी या ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित केला आहे.

सात निर्णय, सात क्षेत्र! फडणवीस सरकारचा विकास रोडमॅप जाहीर, 7 महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

त्यांनी संसदेत या ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली. मात्र या चर्चेनंतर त्यांना पश्चाताप होत असेल. त्यांनी ही चर्चेची मागणी करून स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. त्यावर आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाने देखील फटकारले आहे. तसेच यावेळी त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले की, राहुल गांधी काहीही बोलत असतात त्यांचा बालिशपणा देशाने पाहिला आहे.

शहरातील वाढत्या चोरीप्रकरणांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही…, आमदार जगतापांनी दिला आंदोलनाचा इशारा

दरम्यान या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरवर प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यावेळी खासदारांनी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या वेळी सैन्याने दाखवलेल्या साहसाला सलाम केला. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तिरंगा अभियानवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, खासदारांनी आपल्या मतदारसंघात घर-घर तिरंगा मोहीम राबवावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube