लोकसभेचा आज शेवटचा टप्पा; दुपारपर्यंत हिमाचलमध्ये सर्वाधिक तर ओडिशामध्ये सर्वात कमी मतदान

लोकसभेचा आज शेवटचा टप्पा; दुपारपर्यंत हिमाचलमध्ये सर्वाधिक तर ओडिशामध्ये सर्वात कमी मतदान

Lok Sabha Elections Last Phase Voting  : गेली दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यातील आजचा शेवटचा दिवस. लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सुरू झालेला महासंग्रास शांत होईल तो 4 तारखेला. मात्र, सात टप्प्यात लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या त्यातील देशभरात पार पडत असलेला आजचा शेवटचा टप्पा. (Lok Sabha Elections) आज 1 जून रोजी देशातील 8 राज्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. (Last Phase Voting  ) यामध्ये एका केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. (Lok Sabha) हे ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासह ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये  सर्वाधिक 31.92 टक्के मतदान झालं. तर, ओडिशामध्ये सर्वात कमी 22.64 टक्के मतदान झालं आहे.

देशात 300 राज्यात 40.. काँग्रेस नेत्यानं सांगितलं ;मविआ; विजयाचं गणित

मतदान कुठं आणि किती मतदार?

आज मतदान होणाऱ्या अखेरच्या टप्प्यात हिमाचल प्रदेशातील सर्व चार, पंजाबमधील सर्व १३, पश्चिम बंगालमधील नऊ, उत्तर प्रदेशातील १३, बिहारमधील आठ, ओडिशातील सहा, झारखंड व चंदीगडमधील प्रत्येकी तीन जागांवर मतदान होत आहे. ओडिशाच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही आजच मतदान होणार असून, हिमाचल प्रदेशातील सहा विधानसभा जागांसाठीही पोटनिवडणूक होत आहे. तसंच, या टप्प्यात १०.०६ कोटी नागरिक मतदानासाठी पात्र असून त्यात ५.२४ कोटी पुरुष, ४.८२ कोटी महिला आणि ३,५७४ तृतीयपंथींचा समावेश आहे.

किती उमेदवार रिंगणात?

या निवडणुकीत एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये बसपाने सर्वाधिक ५६ उमेदवार उभे केले आहेत. त्यापाठोपाठ भाजपने ५१ आणि काँग्रेसने ३१ उमेदवार उभे केले आहेत. संपूर्ण पंजाबमधील मतदानासह, राज्यात या टप्प्यात सर्वाधिक ३२८ उमेदवार आहेत. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील १३ जागांसाठी १४४ उमेदवार आहेत. बिहारमध्ये ८ जागांसाठी १३४, तर पश्चिम बंगालमध्ये ९ जागांसाठी १२४ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, देशात सध्या उष्णतेची लाट आलेली आहे. अनेक ठिकणी लोकांचे जीव गेले आहेत. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाकडून पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

 

महत्त्वाचे उमेदवार

  • नरेंद्र मोदी, भाजप (वाराणसी, उत्तर प्रदेश)
  • अनुराग ठाकूर, भाजप (हमीरपूर, हिमाचल प्रदेश)
  • अभिषेक बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस (डायमंड हार्बर, प. बंगाल)
  • कंगना राणावत, भाजप (मंडी, हिमाचल प्रदेश)
  • विक्रमादित्य सिंह, काँग्रेस (मंडी, हिमाचल प्रदेश)
  • आनंद शर्मा, काँग्रेस (कांगडा, हिमाचल प्रदेश)
  • मीसा भारती, राजद (पाटलीपुत्र, बिहार)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube