ब्रेकिंग! उत्तराखंडच्या चमेलीत निर्माणाधीन बोगदा कोसळला; 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी

tunnel collapses in Uttarakhand उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पिपळकोटी येथे गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली.

Tunnel Collapses In Uttarakhand's Chamoli

Under-construction tunnel collapses in Uttarakhand’s Chamoli 7 dead, 14 injured : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पिपळकोटी येथे गुरुवारी (13 ऑगस्ट 2026) सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. THDC हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल घुसल्याने तेथे काम करणारे अनेक कामगार अडकले. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बोगद्यात अडकलेल्या इतर कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवली जात आहे.

दहा वर्षांनंतर इन्स्टाग्रामने बदलला लोगो! तुम्हाला दिसतोय का हा हटके बदल?

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील मायापूर (पिपळकोटी) येथील THDC जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात गुरुवारी सायंकाळी पाणी आणि मोठ्या प्रमाणात मलबा शिरल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला असून, 14 जण जखमी झाले आहेत. बोगद्यात अडकलेल्या 22 कामगारांपैकी 21 जणांचा शोध लागला असून, एक कामगार अद्याप बोगद्यात अडकलेला आहे. HCC कंपनीकडून बांधण्यात येत असलेल्या बोगद्यात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा घुसला. त्यावेळी कामावर असलेले कामगार बोगद्यात अडकले.

पॅकेज्ड अन्नपदार्थांवरील चेतावणी लेबलिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेत; सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निरीक्षण

घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तसेच अन्य यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली. बोगद्यात अजूनही अडकलेल्या कामगारापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. मलबा हटवण्यासाठी तसेच बोगद्यात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे.

पवारांनी चाकणबाबत पोस्ट करताचा फडणवीसांची भली मोठी पोस्ट…सगळे बारकावे सांगितले

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुक्रवारी पिपळकोटी येथे पोहोचून बचावकार्याचा आढावा घेतला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उतरवणेही आव्हानात्मक ठरले.पिपळकोटी येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री धामी घटनास्थळी जाऊन सुरू असलेल्या बचाव मोहिमेची पाहणी करणार आहेत. प्रशासन, पोलीस, SDRF, NDRF आणि अन्य बचाव यंत्रणांकडून ते मोहिमेच्या प्रगतीची माहिती घेऊन आवश्यक निर्देश देणार आहेत.

पुणे मनपात नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तीपत्रे देत 150 हून अधिक तरुणांची कोट्यवधींची फसवणूक

तसेच बचावण्यात आलेल्या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीचीही ते चौकशी करणार आहेत.बोगद्यात अडकलेल्या प्रत्येक कामगाराला सुरक्षित बाहेर काढणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत, असे मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी सांगितले की, THDCच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या बांधकामादरम्यान ही दुर्घटना घडली. उर्वरित कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथके सातत्याने प्रयत्न करत आहेत.

चाकणमधील 20 कंपन्यांचे स्थलांतर म्हणजे धोक्याचा इशारा; शरद पवारांच्या सरकारला तातडीच्या सूचना

घटनास्थळी उपलब्ध असलेली यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. बोगद्यात पाणी आणि मलबा शिरल्यामुळे कामगार अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी SDRFची पथके तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या ड्रम बोटींचाही वापर करत आहेत.दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या शेवटच्या कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरूच आहे.

follow us