Download App

सिविल डिफेन्स नियम म्हणजे काय? संकटाच्या काळात केंद्र अन् राज्य सरकारांना कोणते अधिकार..

Civil Defence Rules : भारत आणि पाकिस्तानातील तणाव प्रचंड (India Pakistan War) वाढला आहे. याच दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नागरिक सुरक्षा नियम 1968 अंतर्गत आपत्कालीन शक्तींचा वापर करण्याचे निर्देश दिले. गृह विभागाच्या आदेशानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नागरिक सुरक्षा नियम 1968 चे कलम 11 चा वापर (Civil Defense Rules) करू शकतात.

आपत्कालीन प्रसंगात तत्काळ कार्यवाही सुनिश्चित करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित निदेशकांना खरेदी करण्याचे अधिकार याद्वारे मिळतात. भारतात सध्या युद्धाची स्थिती आहे. काल रात्री पाकिस्तानने भारतात (Operation Sindoor) हल्ले केले. भारतानेही पाकिस्तानात जोरदार हल्ले केले. अशा परिस्थितीत गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.

नागरिक सुरक्षा नियम 1968 काय

नागरिक सुरक्षा अधिनियमांतर्गत नागरिक सुरक्षा नियम 1968 तयार करण्यात आला. भारतातील नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देता यावे यासाठी हा नियम तयार करण्यात आला. कोणत्याही प्रकारे हल्ला झाला तरी त्याचे उत्तर देण्यास नागरिक तयार असतील हा या नियमाचा उद्देश आहे. हल्ला होण्याआधी आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी तसेच अशा घटना घडल्या तर नंतर याचे प्रत्युत्तर देण्यासाठी या नियमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारांना व्यापक अधिकार मिळतात.

“सिंधू पाणीवाटप करारात आम्ही काहीच करू शकत नाही”, जागतिक बँकेचाही पाकिस्तानला ठेंगा

नियमांतर्गत कोणत्या परवानग्या मिळतात

हवाई आणि रात्रीच्या वेळच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी सरकार स्ट्रीट लाइट, होम लाइटवर निर्बंध आणू शकते किंवा त्यांना नियंत्रित करू शकते.

सुरक्षेसाठी प्रकाशाच्या संकेतांनी नियंत्रित करता येते.

जर लाईटमुळे काही धोका उत्पन्न होत असेल तर अधिकारी रस्त्यांवरील वाहतूक प्रतिबंधित करू शकतात.

शत्रूंसाठी व्हिजिबिलीटी कमी करण्यासाठी आवाज होणाऱ्या गोष्टींना नियंत्रित करण्याचे अधिकार या नियमाद्वारे मिळतात.

अग्नि नियंत्रण, आग लागल्यास नियम काय सांगतो

परिसराच्या मालकांना अग्नि सुरक्षा उपाययोजना करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

पोलीस किंवा संबंधित अधिकारी परिसराची तपासणी करू शकतात. जर या सूचनांचे पालन मालकांनी केले नाही तर कारवाई केली जाऊ शकते.

आगीच्या वेळी अधिकृत कर्मचारी कोणत्याही मालमत्तेत प्रवेश करू शकतील. आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करू शकतात.

Video : 400 ड्रोनच्या माध्यमातून रेकीचा प्रयत्न; कर्नल कुरेशींनी सांगितल्या पाकिस्तानच्या कुरापती

follow us