VIDEO : राज्यात येत्या 23 तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार…शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
Rahul Shewale News : राज्यात येत्या 23 तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार असून विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) आणि संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमच्या उदयाची नाही तर स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी, असा सल्ला शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी विरोधकांनी दिलायं. तसेच सुर्याचा उदय व्हायचा तो जून 2022 मध्ये झालेला आहे. एकनाथ शिंदेंनी तो ऐतिहासिक निर्णय घेतलायं, सुर्य हा एकच असतो, दुसरा होत नाही, असंही शेवाळे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना राहुल शेवाळे म्हणाले, अस्वस्थता महायुतीत नाही तर महाविकास आघाडीत आहे. आघाडी स्वार्थासाठी सत्तेसाठी झालीयं. स्वार्थ निघून जाते, तेव्हा बिघाडी दिसून येत तीच बिघाडी दिसतीयं. अस्तित्व वाचवण्यासाठी आता पक्षांचे प्रमुख हातपाय पसरवत आहेत. आमदारांची नाराजी नाही अशा गोष्टी सर्वच पक्षात असतात. फडणवीस मुख्य नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढतली असा, विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केलायं.
भारताच्या गोल्डन बॉयचा चाहत्यांना सुखद धक्का; भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा अडकला विवाहबंधनात
विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी शिवेसनेची काळजी करु नये. येत्या 23 तारखेच्या भूकंपासाठी ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे 15 तर काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात आहेत, शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आमदार, खासदार इच्छूक आहेत, केंद्रातही भूकंप होऊ शकतात, असाही दावा राहुल शेवाळे यांनी केलायं.
Sonali Patil : परी म्हणू की सुंदरा… सोनालीच्या साडीतील लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!
दरम्यान, आपल्या आमदारांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत अशा बातम्या महायुतीत अस्वस्थ असल्याच्या बातम्या पसरवत आहेत. खरंतर महायुतीत नाही तर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा राहुल शेवाळेंनी केलायं.
रायगड नाशिक पालकमंत्र्यांबाबत जो निर्णय झाला त्यामुळे शिवसेना आमदार नाराज आहेत. रायगडमध्ये 3 सेनेचे आमदार तर नाशिकमध्ये दादा भुसे पालकमंत्री होते, आमदारांची नाराजी पक्षांतर्गत व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तिन्ही पक्षाला सोबत घेऊन चालायचे मुख्यमंत्री फडणवीस ही नाराजी दूर करतील असा आम्हाला विश्वास असल्याचं राहुल शेवाळेंनी सांगितलंय.