राष्ट्रवादीच्या मंचावर झळकली भाजपच्या वॉशिंग मशीनची क्लिप
NCP Camp : भ्रष्टाचाराचा आरोप असलेले नेते भाजपाकडे गेले की निष्कलंक होतात. तसेच जे नेते भाजपात सामील होत नाही त्यांच्या मागे सरकारी यंत्रणा लावल्या जातात. ED , CBI अशा यंत्रणांचा वापर करून भाजपा नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेते असा आशय असलेली एक व्हिडीओ क्लिप राष्ट्रवादीच्या मंचावर झळकली. एक प्रकरे भाजपच्या वॉशिंग मशीनवरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच काही नेत्यांच्या क्लिपदेखील यावेळी दाखवत भाजपची पोल खोल करण्याचा व्हिडीओ यावेळी राष्ट्रवादीने थेट पडद्यावर झळकवला.
राष्ट्रवादीचे शिबीर आज मुंबईमध्ये पार पडले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, जयंत पाटील, तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित होते. यावेळी मंचावर नेत्यांचे भाषणे सुरु होती. यातच भाजपचे वॉशिंग मशीनची एक क्लिप मंचावरील स्क्रीनवर झळकली. याद्वारे राष्ट्रवादीने थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहे. अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले आहे. यातूनच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. मात्र कारवाईतून बचावासाठी नेतेमंडळी भाजपात जात असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जातो आहे. तसेच अशा आशयाचा मजकूर देखील या व्हिडिओमध्ये दिसतो आहे.
जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान…सुप्रिया सुळेंनी सांगितल्या आठवणी
सत्ताधारी भाजप केंद्रीय यंत्रणाचा वापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करत आहे. तसेच नेत्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्यासाठी भाजप असा प्रकार करत आहे. आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, ज्यात माणसे धुऊन निघतात व निष्कलंक होतात असे वक्तव्य देखील भाजपच्या काही नेत्यांनी केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते आहे.