शपथपत्रात मालमत्तेची खोटी माहिती? निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तारांना दणका, 24 तासांत अहवाल देण्याचे निर्देश

शपथपत्रात मालमत्तेची खोटी माहिती? निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तारांना दणका, 24 तासांत अहवाल देण्याचे निर्देश

Abdul Sattar False Information In Election Affidavit : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) रिंगणात आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दाखल केलं होतं. या शपथपत्रामध्ये तब्बल 16 चुका आहेत, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीय. अब्दुल सत्तार यांनी चारचाकी वाहन, मालमत्ता आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसदर्भात खोटी माहिती (Maharashtra Assembly Election 2024) दिलीय, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केलाय. त्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय.

महेश शंकरपेल्ली यांनी केलेल्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतलीय. सत्तार यांना 24 तासाचा वेळ दिलेला आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी मालमत्तेसंदर्भात माहिती लपवली, असा आरोप केला गेलाय. निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. ई-मेलद्वारे 24 तासांच्या आत जिल्हाधिकारी आणि सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी यांना अहवाल पाठवण्याचे निर्देश, अब्दुल सत्तार यांना दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा अचानक वाढली, बिष्णोई गँग कनेक्शन समोर?

अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे सरकारमधील अल्पसंख्यांक विकास आणि पणन मंत्री आहेत. त्यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र सादर केलंय. यातील त्रुटींवर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी 16 मुद्यांद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार अब्दुल सत्तार यांनी सादर केलेल्या शपथपत्रांत खोटी, भ्रामक आणि दिशाभूल करणारी माहिती आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा, असं म्हटलंय. याची दखल निवडणूक आयोगाने घेतलीय.

Shahrukh Khan Birthday : किंग खानच्या 59 व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

यामुळे निवडणुकीपूर्वीच अब्दुल सत्तार यांच्या उमेदवारीवर ग्रहण लागल्याचं दिसतंय. अब्दुल सत्तार यांनी शपथपत्रामध्ये दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील आणि प्रत्यक्ष मालमत्तेत मोठी तफावत आहे. पुराव्यानिशी सत्तार यांच्या शपथपत्राविरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील सत्तार यांनी शपथपत्रात अनेक गोष्टी लपवल्या होत्या. ते प्रकरण अजून सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube