राष्ट्रवादीने कोणाबरोबर जावे ? सी वोटरच्या सर्वेत धक्कादायक मते

  • Written By: Published:
राष्ट्रवादीने कोणाबरोबर जावे ? सी वोटरच्या सर्वेत धक्कादायक मते

ABP C Voter Survey On Sharad Pawar Resigns: शरद पवार यांनी काल राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्षपदही त्यांनी सोडले आहे. पवार यांच्या या निर्णयाने राज्यातील राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीने कोणाबरोबर जावे, याबाबत राजकीय चर्चा आहे. या राजकीय वातावरणात एबीपी न्यूजसाठी सी वोटरने राज्यात एक सर्वे केला आहे. त्यात अनेक धक्कादायक मते लोकांनी व्यक्त केली आहेत.

पहाटे 4 वाजता चहा-नाश्त्याच्या 50 ऑर्डर, मुंबई पोलिसांनी पकडले बनावट कॉल सेंटर रॅकेट

शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीच्या घोषणेनंतर हा पहिल्याचा सर्वे झाला आहे. पवार यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काय केले पाहिजे. कोणाबरोबर गेले पाहिजे, असा सर्वे करण्यात आला आहे. त्यात ५७ टक्के लोकांचे म्हणणे की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा घटक राहिले पाहिजे. तर २३ टक्के लोकांचे म्हणणे आहे की राष्ट्रवादीने भाजपबरोबर गेले पाहिजे. तर राष्ट्रवादीने कुणाबरोबर न जाता एकट्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असे वीस टक्के लोकांचे मत आहे.

सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का ? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिलं नेमकं उत्तर

पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी व भाजप यांनी एकत्र येणे सोपे झाले का या प्रश्नावर लोकांनी उत्तरे दिली आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणे आता सोपे झाले असल्याचे ३७ टक्के लोकांना म्हटले आहे. तर ३७ टक्के लोकांनी भाजप व राष्ट्रवादी एक येऊ शकत नाही, असे उत्तर दिले आहेत. तर २६ टक्के लोकांनी याबाबत माहीत नसल्याचे सांगितले.

सी व्होटरने राज्यातील १ हजार ६३८ लोकांचे मते जाणून घेतले आहेत. बुधवारी (३ मे रोजी) हा सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेत तीन ते पाच टक्के त्रुटी धरण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube