उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्व अन् महाराष्ट्राला कलंक, फडणवीसांनंतर बावनकुळेंनीही सोडलं नाही

उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्व अन् महाराष्ट्राला कलंक, फडणवीसांनंतर बावनकुळेंनीही सोडलं नाही

Maharashtra politics : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असा हल्लाबोल केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे, अशी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे तुम्ही 2019 साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं तुम्ही वाहिलं हेही महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं, असे बावनकुळे म्हणाले.

आदिवासी तरुण लघुशंका प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी पाय धुतलेला ‘तो’ पीडित तरुण नाही? चर्चांना उधाण

घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही 100 कोटींची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला होता. फडणवीस म्हणाले होते की आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक. सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक”, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्यावरुन आव्हाड-पटेल यांच्यात जोरदार भांडण, भुजबळांचा गौप्यस्फोट

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. त्यानंतर ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’, असं म्हणत निशाणा साधला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube