हायहोल्टेज ड्रामा! राजन पाटलांनी ट्रॅप लावला, रस्ते अडवले, पाठलाग केला; उज्वला थिटेंचा पहाटे पोलिस बंदोबस्तात अर्ज…
सोलापुरातील अनगर नगरपंचायतीसाठी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी पहाटे पोलिस बंदोबस्तात उमेदवार अर्ज दाखल केलायं.
Anagar Nagar Panchayat Election : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशीच सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या (Anagar Nagar Panchayat Election ) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यावरुन हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळालायं. अजित पवार गटाकडून आज पहाटेच्या सुमारास उज्वला थिटे (Ujwala Thite) यांनी पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील भाजपकडून रिंगणात असून अजित पवार गटाकडून उज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आलीयं. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजन पाटलांनी माझा रस्ता अडवला, दोन दिवसांपासून कार्यकर्ते पाठलाग करत असल्याचा गंभीर आरोप उज्वला थिटे यांनी केलायं. थिटे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करीत राजन पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत.
अनगर नगरपंचायतीत हायहोल्टेज ड्रामा! ट्रॅप लावला, रस्ते अडवले, पाठलाग केला; उज्वला पहाटे थिटेंचा पोलिस बंदोबस्तात अर्ज भरला… #anagarnagarpanchayatelection #ujwalathite #rajanpatil pic.twitter.com/OCRjRz8H0L
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 17, 2025
मला अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर मी उमेदवारी अर्ज भरु नये, यासाठी राजन पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील, मागील आठ दिवसांपासून माझा ट्रॅप लावला. माझ्यामागे कार्यकर्ते पाठवून माझा पाठलाग केला, माझ्याकडून निवडणुकीचा अधिकार काढून घेतला, मी लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवू शकत नाही का? असा थेट सवाल उज्वला थिटे यांनी केला आहे.
तसेच आज एका महिलेकडून निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जात आहे, निवडणूक बिनविरोध करायची की नाही? याबाबत जनताच ठरवेल, पण मला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे की नाही, मला निवडणुकीचा अर्जही भरु दिला जात नाही, वेगवेगळ्या ठिकाणी माणसं उभी केली जात आहेत. पोलिसांना मी आठ दिवसांपासून संरक्षण मागत आहे, परंतू प्रशासन सहकार्य करत नसल्याचाही गंभीर आरोप उज्वला थिटे यांनी केलायं.
काँग्रेस अध्यक्ष खरगेंना मोठा दिलासा, ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाने याचिका फेटाळली
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर भाजपकडून राजन पाटील यांनी सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न राजन पाटील यांचा आहे. त्यामुळेच ते थिटे यांना उमेदवारी अर्ज भरण्यात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजन पाटलांचं हे कृत्य असल्याचा आरोप थिटे यांनी केला असून आता उज्वला थिटे यांनी अर्ज भरल्यानंतर आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अनगर नगरपंचायतीसमोर वातावरण संवेदनशील असून असून पोलिस प्रशासनाकडून पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आलांय.
भायखळ्यात मोठी दुर्घटना! इमारत पायाभरणीवेळी अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
