अमित ठाकरेंचा ABVPला इशारा; म्हणाले, ‘मुलींवर हात टाकलात तर मार खाणार’

Amit Thackeray on ABVP साठ्ये महाविद्यालयाबाहेरील राड्यानंतर अमित ठाकरे यांनी ABVPला इशारा देत त्यांनी मनविसेची भूमिका स्पष्ट केली.

Amit Thackeray on ABVP

Amit Thackeray on ABVP : मुंबईतील साठ्ये महाविद्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी ABVP च्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीका करत त्यांना थेट इशारा दिला आहे.

ललित प्रभाकर- प्राजक्ता माळी पुन्हा एकत्र ; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’च्या वाढवली उत्सुकता

“तुम्ही मुलींवर हात टाकलात, तर आम्ही तुम्हाला मारणारच. आमच्या नादाला लागू नका,” अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी ABVPला सुनावले. मुंबईत गुरुवारी (20 ऑगस्ट) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सदस्य नोंदणीवरून वाद

साठ्ये महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही विद्यार्थी संघटनांकडून सदस्य नोंदणी अभियान सुरू होते. याचदरम्यान दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

‘17 सप्टेंबरनंतर काय होतं ते बघा’; संजय राऊत आक्रमक, फडणवीस-शिंदेंवर गंभीर आरोप अन् मोदींवरही निशाणा

या घटनेबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी दावा केला की, मनविसेकडून सदस्य नोंदणी सुरू झाली की ABVP कडून त्याच परिसरात सदस्य नोंदणीचा स्टॉल लावण्याचा प्रकार वारंवार केला जातो. महाविद्यालयाच्या गेटवर किंवा आवारात स्टॉल लावू नये, असे सांगण्यात आलेले असतानाही ABVP ने तिथे स्टॉल लावल्याचा आरोप त्यांनी केला.

‘मुलींचा हात धरून घेऊन जात होते’

वादाचे मुख्य कारण सांगताना अमित ठाकरे यांनी ABVPच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केला. त्यांच्या माहितीनुसार, काही कार्यकर्ते मुलींना हात धरून घेऊन जात होते. यावरूनच मनविसेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याचे त्यांनी सांगितले.

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing : धनुष्यबाण चिन्ह गोठणार? आज ठाकरे गटाकडून अंतिम युक्तिवाद

“मुलींचा हात धरून त्यांना घेऊन जाणार असाल, तर आम्ही मारणारच,” असे ठाकरे म्हणाले. तसेच, “आमच्या नादाला लागू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.

‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या’

ABVP वर टीका करताना अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयांमध्ये कँटिन, स्वच्छतागृह आणि विद्यार्थ्यांच्या इतर अनेक समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

“तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काम करायचे असेल तर करा. आम्ही मध्ये येणार नाही. मात्र, जबरदस्तीने विद्यार्थ्यांना सभासद करून घेण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाला खेचून नेले, तर आम्ही नक्की हस्तक्षेप करू,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच मनविसेनेने एलफिन्स्टन आणि चेतना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केल्याचा दावाही त्यांनी केला.

‘जिथे राडा कराल, तिथे मार खाल’

ABVPला लक्ष्य करत ठाकरे यांनी संघटनेची विद्यार्थ्यांमधील पकड कमी झाल्याचा दावा केला. “अभाविपला आता विद्यार्थ्यांमध्ये किंमत उरलेली नाही. जिकडे जिकडे तुम्ही राडा कराल, तिकडे मार खाल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

मुंबईच्या दोन डॉक्टरांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार; जिनांचा ‘तो’ आजार ठेवला गुप्त

दरम्यान, साठ्ये महाविद्यालयाबाहेरील या घटनेमुळे विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला असून, आगामी काळात या वादाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

follow us