शिवसेनेच्या मंत्र्यांच्या ओएसडींकडून पाच लाखांची मागणी; अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट

Amol Mitkari on Shivsena minister OSD : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि ओएसडींबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे अधीच तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये काहींना काही कारणांमुळे खटके उडू लागलेत. त्यात आता आणखी भर पडली आहे. मिटकरी यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या ओएसडींकडून पाच कोटींच्या कामांसाठी पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
यामध्ये अमोल मिटकरी यांनी शिवसेनेचे मंत्री असलेले संदिपान भुमरे, संजय राठोड आणि तानाजी सावंत त्यांच्याकडे मतदारसंघातील कामांना मंजुरी देण्याच्या साठी पैसे मागितल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच ज्या मंत्र्यांच्या पीएने गेल्या सरकारमध्ये अशा प्रकारे पैसे मागितले नाही. त्यांना आता मंत्रिपद दिलं गेलं नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. जसे की अब्दुल सत्तार यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला.
स्वारगेट बस प्रकरण, परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, डेपोतील 23 सुरक्षारक्षक सस्पेंड
दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दलाली बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यासाठी एक विशेष यंत्रणा लागू केली जाणार आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्यातील मंत्र्यांचे ओएसडी नियुक्तीवरून खळबळ माजली आहे. याच दरम्यान अजित पवार गटाचे नेते आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत एक वक्तव्य केलं होतं. मात्र मंत्री केवळ त्यांच्या ओएसडीच्या नावांचे प्रस्ताव पाठवू शकतात. मात्र ते नियुक्त करण्याचे अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना असतात. त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही फिक्स लोकांना ओएसडी म्हणून नियुक्त केले जाणार नसल्याचं ठणकावला आहे.