श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया…

श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया…

Appasaheb Dharmadhikari : रविवारी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यात उष्माघाताने 13 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. याप्रकरणावर ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्रीसदस्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली आपत्ती आहे. झालेला प्रकार दुर्दैवी होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दु:ख व्यक्त करताना म्हटले की महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारखर येथे आलेले सारे श्रीसदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्रीसदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्रीसदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे.

…तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, राजू शेट्टींचे खडेबोल

आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दात व्यक्त झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्रीसदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

झालेला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले. रविवारी झालेल्या दुर्दैवी घटनेत उष्माघाताने 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याने पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले होते. त्यानंतर कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थि होऊ लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube