राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल कधी? नार्वेकरांनी थेट तारीखच सांगितली

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल कधी? नार्वेकरांनी थेट तारीखच सांगितली

Rahul Narwekar : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या (disqualification of NCP MLAs)याचिकांची सुनावणी संपली आहे. आणि त्या प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीच्या आत देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narwekar यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा झटका! के.एल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी!

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी आपल्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा आपण स्वीकारला असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले आहे.

श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून चव्हाणांना ब्लॅकमेल केलंय; यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका

त्याचबरोबर त्यासंदर्भातले गॅझेट नोटिफिकेशन देखील जारी केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही कॉंग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावरुन नार्वेकरांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही. आणि अद्याप आपल्याकडे दुसऱ्या कोणत्याही कॉंग्रेस आमदाराचा राजीनामा आलेला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार होतं, मात्र त्यासंदर्भात अद्यापही राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सूचना मिळाली नसल्याचे यावेळी राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज