श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून चव्हाणांना ब्लॅकमेल केलंय; यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका

  • Written By: Last Updated:
श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून चव्हाणांना ब्लॅकमेल केलंय; यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका

Yashomati Thakur : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता कॉंग्रेस नेत्या शोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले, असा आरोप त्यांनी केला.

नगरचे भूमिपुत्र गोरक्ष गाडीलकर शिर्डी संस्थानचे नवे ‘सीईओ’ 

अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यावर उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली. चव्हाण यांनी आदर्श घोटाळा लपवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं टीकास्त्र त्यांनी डागलं होतं. दरम्यान, यशोमती ठाकूर यांनीही हाच धागा पकडला. आज माध्यमांशी बोलतांना यशोमती ठाकूर म्हणाल्या, नुकतेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे आलं होतं. आपलं नाव आल्यानंतर चव्हाण यांनी राजीनामा दिला, हे कशाचे द्योतक आहे, हे आता स्पष्ट झालं.अशोक चव्हाण यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सतत दबाव होता, पण अखेर त्यांना ब्लॅकमेल करून राजीनामा द्यावा लागला, असं ठाकूर म्हणाल्या.

शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीच्या सीमेवर, राजधानीत महिनाभर जमावबंदी; काय सुरु, काय बंद? 

त्या म्हणाल्या, विरोधकांना ब्लॅकमेल केलं जातंय ही बाब निश्चितच जनता जनार्दनाला रुचणारी नाही. येत्या निवडणुकीत सुजाण मतदार हे अत्यंत विकृत पध्दतीचं राजकारण नक्कीच संपवतील, असा आम्हाला विश्वास आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करत आहे. लोकांना घाबरवलं जात आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनाही घाबरवून भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. भाजपमध्ये एवढी असुरक्षितता आहे की ते अजूनही सर्वच पक्षांतील लोकांना फोडून आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपमध्ये मूळचे कमी आणि बाहेरचे लोक जास्त झाल्याची परिस्थिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमदार ठाकूर म्हणाल्या, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली असली तरी आम्ही अजूनही कॉंग्रेसमध्येच आहोत.संविधानाच्या रक्षणासाठी, धर्मनिरपेक्ष भारतासाठी, सर्व धर्म समभाव या विचारासाठी आम्ही लढत राहू. आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत कॉंग्रेससोबत राहू, असा निर्धार ठाकूर यांनी व्यक्त केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज