Aaditya Thakarey यांच्या ताफ्यावर हल्ला? : निलेश राणेंनी वाभाडे काढले
शिवसेना ठाकरे गटाचे ( Shivasena Thakarey Camp ) युवानेते आदित्य ठाकरे ( Aaditya Thakarey ) हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद ( Aurangabad ) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या सभेत दगड मारण्यात आले. तसेच सभास्थळावरुन निघत असताना त्यांच्यागाडीवर देखील दगड फेकण्यात आले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणेंनी ( Nilesh Rane ) ट्विट करत निशाणा साधला आहे.
हा आदित्य इतका बदमाश आहे की स्वतःच्या हितासाठी तो कोणालाही विकू शकतो. आजोबांचा पक्ष यांनी रसातळाला नेला, सगळ्यांचा खरा राग ह्याच्यावर आहे. तरी हा निर्लज्ज्यासारखा फिरत असतो, असा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे. तसेच पोलिसांच्या चौकशीत माहिती पडेल हा हल्ला यानेच घडवून आणला आहे. स्वत: चे संरक्षण वाढवण्यासाठी हल्ला घडवून आणल्याचे राणेंनी म्हटले आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांची महालगाव येथे दोन दिवसांपूर्वी सभा होती. त्या सभेत हा हल्ला झाल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. यावर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या सभेत दगडफेक झाली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेत कोणताही गोंधळ झालेला नाही. सभेमध्ये दगडफेक झालेली नाही. सभा सुरळीत पार पडली, असे पोलिसांनी म्हटले आहे.
या घटनेवरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे यांनी या घटनेत शिंदे गटाचे नेते व वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचे नाव घेतले आहे. त्याठिकाणी आलेले लोक हे बोरनारेंच्या नावाने घोषणा देत होते, असा आरोप दानवेंनी केला आहे.