‘क्षीरसागरांच्या घरावरील हल्लात पोलिसांनी खबरदारी घेतली नाही’

‘क्षीरसागरांच्या घरावरील हल्लात पोलिसांनी खबरदारी घेतली नाही’

Jayant Patil : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservaition) राज्यातील राजकारण तापले आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरु भुजबळांनी गृहखात्यावर टीका केली होती. आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही गृहखात्यावर टीका केली आहे.

बीडमध्ये जे हल्ले झाले, असं महाराष्ट्रात कधी झालं नाही. दिवसभर पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. पायी चालत मॉब एका घरावरुन दुसऱ्या घरावर गेला. हे अतिशय आश्चर्यकारक आहे. काही ठराविक लोकांना टार्गेट करणे हे चुकीचे आहे. सरकारची गुप्तचर यंत्रणा कमी पडली. ज्यावेळी ही घटना घडत होती, त्यावेळी पोलीस देखील आपल्या जबाबदारीपासून लांब राहिले, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Jitendra Awhad : बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला तेव्हा तटकरेंनी मला दम भरला होता; आव्हाडांचे तटकरेंवर गंभीर आरोप

आम्ही कितीही मागण्या केल्या तरी त्याचा परिणाम होत नाही. ज्यांची जबाबदारी आहे ते फेल झाले आहेत हे दिसून येते. बीडच्या एसपींना आठ ते नऊ वेळा फोन केला की आमचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरासमोर पोलीस जमाव जमा झाला आहे. पण त्यांनी फोन घेतला नाही. संदीप क्षीरसागर यांनी सांगितले पोलीस कंबरेवर हात ठेऊन उभा आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Letsupp Special : 30 वर्षांनंतर ‘जालना’ पुन्हा ठरणार OBC आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू

सरकारमधले काही लोक या बाजूच बोलत आहेत तर काही लोक त्या बाजूचं बोलत आहेत. असं काही आहे का हे तपासलं पाहिजे. सरकारने एकमत केलं पाहिजे. मुख्यमंत्री एक बोलत आहेत, उपमुख्यमंत्री दुसरं बोलत आहेत, आता तर मंत्री वेगळं बोलायला लागले आहेत. त्यांनी त्यांच एकमत करावं, असं जयंत पाटील म्हणाले.

दोन्ही समाजात वाद होऊ नये अशी आमची भूमिका राहिलेली आहे. शरद पवार यांची कायम भूमिका राहिलेली आहे. समाजात कटुता निर्माण होऊ नये, ही काळजी सरकारने घ्यावी, असं जयंत पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube