बच्चू कडू हे काय बोलून गेले, तीन इंजिनच्या सरकारमध्ये कधीही बिघाडी
Bachchu Kadu : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) आणि खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटेना. हाच तिढा सोडवण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या काही नेत्यांसोबत दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटेचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं विधान केलं. राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश असलेले तीन इंजिन असलेले सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं कडू म्हणाले. तसंच काँग्रेसच्या काही आमदारांना सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं. (Bachchu Kadu on shinde fadanvis pawar goverment they said A three engine government can collapse anytime)
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांचा शपथविधी होऊन आठवडा उलटून गेला. मात्र, खातेवाटपाचा तिढा काही सुटला नाही. मंत्रिपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मंत्रिपद आणि पालकमंत्री पदावरून महायुतीत गुंतागुंत वाढत चालली आहे. दरम्यान, आता बच्चू कडू यांनी महायुतीच्या भवितव्याबाबत सूचक वक्तव्य केलं. आज माध्यमांशी संवाद साधतांना बच्चू कडू म्हणाले, राष्ट्रवादीच्या फुटीर गटाच्या शपथविधी सोहळ्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी देण्यात आली नसावी. त्यामुळेच आमच्या शपथविधीचा विचार झाला नसावा, असा धक्कादायक दावा कडू यांनी केला. ते म्हणाले, आता खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल, असं मला वाटतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे हे सरकार तीन इंजिनाचे सरकार आहे. त्यामुळं हे सरकार मजबूत आहेच. पण, तीन तीघाडा म्हणून कधीही यात बिघाडी होऊ शकते. बिघाडी होऊ नये, यासाठी बैठका सुरू असतील.
अजित पवार एकटेच नाही, तर ‘या’ नेत्यांसोबत दिल्लीत दाखल, खातेवाटपाचा तिढा सुटणार?
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना बच्चू कडू पुढे म्हणाले की, सध्या राज्यात खातेवाटप किंवा नवीन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असेल. आता अशी माहिती कानावर येत आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उरलेला गटही सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या काँग्रेसमध्येही काहीही होऊ शकते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झालीच आहे. आता फक्त काँग्रेस उरली आहे, त्यांनाही जुळवून घेण्याचे प्रयत्न असतील, असं मला वाटतं. त्यानंतर रणनीती कशी आखायची हे ठरवण्यासाठी नेते दिल्लीत गेले असणार, असं कडू म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलतांना कडू यांनी अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील सहभागावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नको, अशी माझी नाही तर शिवसेना आमदारांची मागणी आहे, असं ते म्हणाले.