मुंडे भगिनींची सावरकर गौरव यात्रेला दांडी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T180803.639

Pankaja Munde absent in Sawarkar Gourav Yatra :  गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवकर यात्रा काढण्यात येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सावरकर गौरव यात्रा काढण्यात आलेली आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या आरोपावरुन भाजप व शिवसेना आक्रमक झालेली आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून भाजप व शिवसेनेच्यावतीने ही यात्रा काढण्यात आलेली आहे.

आज भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात ही यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पण या यात्रेत पंकजा मुंडे या सहभागी झाल्या नव्हत्या. एवढेच नाही तर त्यांच्या बहीण  व बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या देखील या यात्रेमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. एकीकडे राज्यातील सर्व मोठे नेते सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेले असताना पंकजा मुंडे  व प्रीतम मुंडे या यात्रेमध्ये सहभागी झाल्या नसल्याे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Girish Mahajan : लोक संजय राऊतांकडे जोकर म्हणून बघतात

याआधी ही सावरकर गौरव यात्रा नागपूर येथे असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच नागपूर येथील सावरकर गौरव यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील सहभागी झाले होते. काल जालना येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील सहभागी झाले होते. राज्यातील एवढे दिग्गज नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले असताना पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांनी या यात्रेला दांडी मारली आहे.

त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे प्रितम मुंडे या येऊ शकलेल्या नाहीत. तर पंकजा मुंडे या मुंबई येथे पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यामुळे ते परळी येथे येऊ शकलेल्या नाहीत, असे त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूक कधी होणार, बावनकुळेंनी महिना सांगून टाकला..

दरम्यान, याआधी राज्यात सत्ता स्थापन झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड येथे आले असताना तेव्हा देखील पंकजा मुंडे या गैरहजर होत्या. तसेच काही  महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर  संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते तेव्हा देखील पंकजा मुंडे या गैरहजर होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube