पोरांचा हात धरुन ठेवला असता तर.., मंत्री होताच भुजबळांची पवारांवर सडकून टीका…

पोरांचा हात धरुन ठेवला असता तर.., मंत्री होताच भुजबळांची पवारांवर सडकून टीका…

Minister Chagan Bhujbal : आपल्या पोरांचा हात धरुन ठेवला असता तर कशाला हे झालं असतं, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केली आहे. शरद पवारांनी दुसऱ्यांचा हात धरला होता, ज्यांचे हात धरले आहेत, ते तुमचे राहणार आहेत काय? असा खोचक सवाल उपस्थित करीत भुजबळांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनाही सोडलं नाही. दरम्यान, मंत्रिपदाची सुत्रे हाती येताच भुजबळांनी येवल्यात छोटेखानी सभा घेतली. सभेत ते बोलत होते.

शिंदे-फडणवीस, पवारांच्या महायुतीत ‘कोकण कन्या’ तटकरेंनी मारली बाजी

मंत्री भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, शरद पवारांनी दुसऱ्यांचाच हात वर केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या पोरांचा हात धरुन ठेवला असता तर एवढं घडलंच नसतं, तेव्हा मी सांगत होतो, ज्यांचा हात तुम्ही धरलायं ते तुमचे होणार आहेत काय? असं भुजबळ म्हणाले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या नोटीसीवर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच यावर…

तसेच राष्ट्रवादी पक्षाची स्थापनाच माझ्या घरात झाली होती. त्यावेळी पक्षासाठी लागत असलेले एक हजार अॅफिडिव्हिट आणि झेंडाही माझ्या घरात ठरला होता. राष्ट्रवादी पक्ष स्थापन करण्यासाठी छगन भुजबळ पहिला होता. आपला झेंडा घड्याळ अन् पक्षही राष्ट्रवादीच असल्याचं छगन भुजबळांनी यावेळी ठणकावून सांगितलं आहे.

Baipan Bhaari Devaची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई; १४ दिवसात कमावले इतके कोटी रूपये

पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार असून सभेत मी अधिकचं काही बोलणार नाही. अजित पवारांनाच बोलण्याची संधी देणार आहे. मला मंत्रिपदाचं अप्रुफ आता राहिलेलं नाही पण महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम करणार आहे. कोविड काळात लॉकडाऊनमध्ये अन्न पुरवठ्याचं काम सतत सुरु राहणार असल्याचं मी सांगितलं होतं, भुजबळांनी मोठा संघर्ष केला आहे. मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आलेला नाही त्याला कोणी गॉडफादरही नव्हता, असंही ते म्हणाले आहेत.

शरद पवारसाहेबांनी आमच्याविषयी बोलू देत पण ते आमचे साहेबच आहेत, त्यांचे आशिर्वाद आमच्यासोबत कायम आहेत. काही मतभेद झाले पुढे काय होतंय ते पाहु, आज खातेवाटप जाहीर झाले असून मी पुन्हा अन्न नागरी पुरवठा मंत्री झालो आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करणार असल्याचा निर्धार मंत्री भुजबळ यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube