काँग्रेस नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्न; बावनकुळेंची जळजळीत टीका

काँग्रेस नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्न; बावनकुळेंची जळजळीत टीका

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसच्या नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्न पडत असल्याची जळजळीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलीयं. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून पंतप्रधान पदावर दावा केला जात आहे. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेस नेत्यांवर टीका केलीयं. मुंबईतून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

T20 World Cup 2024 सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का, ICC ची ‘ही’ चूक पडू शकते महागात

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्नं पडत आहेत. काँग्रेस पक्ष देशभरात केवळ 240 जागांवरच लढत आहे, मग त्यांचा पंतप्रधान कसा होणार? ते कसे देशाचं नेतृत्व करू शकतात. बहुमतासाठी आणि पंतप्रधान बनण्यासाठी 272 जागा निवडून याव्या लागतात. काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपाला आव्हान दिले आहे. कमी प्रभाव असलेल्या राज्यात काँग्रेसने अधिकाधिक जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत, तर त्यांचा पंतप्रधान कसा होणार? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी केलायं.

‘घाटकोपर’ प्रकरणात राजकारणाला उकळ्या; सोमय्या, राणे अन् कदमांनी ठाकरेंना घेरले

तसेच बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये 168 जागांपैकी केवळ 44 जागांवर काँग्रेस लढत आहे. दिल्ली, झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही काँग्रेसने आपल्या मित्रांना अधिकाधिक जागा सोडल्या असल्याचंही बावनकुळे म्हणाले आहेत.

अश्रुधुराचे गोळे, हवेत फायरिंग, अन् 90 जखमी; पाकव्याप्त काश्मिरात का तुटला संयम?

निकालानंतर दोन पक्ष दिसणार नाहीत म्हणूनच…
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण दोन पक्ष दिसणार नाहीत म्हणूनच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विलिनीकरणाची भाषा सुरू केलीय, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांना माहितीये की बारामती त्यांच्या हातून जाणार आहे. महाविकास आघाडीचा फुगा फुटला असून झाड-पत्यासारखी झाली आहे. मोदीजींच्या वादळामध्ये आघाडी उडाली असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अस्तित्व संपले असल्याचीही टीका बावनकुळेंनी यावेळी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube