सभागृहाच्या अध्यक्षांना मान ठेवण्याचे देखील भान नाही; चंद्रशेखर बावनकुळे ठाकरे गटावर भडकले !

  • Written By: Published:
सभागृहाच्या अध्यक्षांना मान ठेवण्याचे देखील भान नाही; चंद्रशेखर बावनकुळे ठाकरे गटावर भडकले !

Chandrashekhar Bawankule Slam Uddhav Thackeray group: विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. नार्वेकर यांचे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या आमदारांनी अभिनंदन केले आहे. पण उद्धव ठाकरे गटाच्या एकाही सदस्याने नार्वेकर यांचे अभिनंदन केले आहे. त्यावरून भाजपचे आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Group) गटावर जोरदार टीका केली.

संसदीय लोकशाहीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाला घटनात्मक महत्त्व आहे. राज्यातील 14 कोटी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे म्हणजेच सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणजे विधानसभा आहे. या पवित्र सभागृहाच्या अध्यक्षांचा वेळोवेळी अपमान मागील अडीच वर्षात उबाठा गटाने अतिशय निंदनीय शब्दात केला. आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर माननीय अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करण्यासाठी उबाठाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता. ही बाब उबाठा गटाच्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करते. हा अपमान केवळ विधानसभा अध्यक्षांचा नसून या राज्यातील चौदा कोटी जनतेचा अपमान आहे.

एपी धिल्लन कॉन्सर्ट आयोजित करण्याची प्रेरणा काय? निर्मात्यांनी सांगितली शो उभा करण्याची गोष्ट…

ज्या लोकांना सभागृहाच्या प्रथा, परंपरा पाळण्याची चाड नाही, ज्यांना सभागृहाचा व सभागृहाच्या अध्यक्षांचा मान ठेवण्याचे देखील भान नाही, ते पुढील काळात जनतेच्या प्रश्नांसाठी किती संवेदनशील असतील याबाबत विचार जनतेनेच केला पाहिजे. यानिमित्ताने यांना नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य होता हेच पुन्हा एकदा अधोरेखित होते.

मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक, एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

परंतु, यावेळी उबाठा सोबतच महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी हे सौजन्य दाखवत अध्यक्ष महोदयांचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले. ही खरोखरच स्वागतार्ह बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे, विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये असलेला सुसंवाद हा महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारा आहे. महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या जनतेची, जनतेच्या मताची, या जनतेचे प्रतिनिधित्व करत असलेल्या सभागृहाची आपल्याला किती किंमत आहे, हे आज उबाठा गटाने आपल्या वर्तनातून दाखवून दिले. त्यांच्या या वर्तनाचा निषेध करावा, तेवढा थोडाच आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube