भाजपला विचारल्याशिवाय…राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका
Chhagan Bhujbal: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारून निर्णय घ्यावा लागणार आहे.
Chhagan Bhujbal On Ncp Merger : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणावर जोरदार दावे, प्रतिदावे सुरू आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते हे ठामपणे अजित पवार हे विलिनीकरणाच्या बाजूने होते, असे दावे केले जात आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असे दावे खोडून काढत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे दावे फेटाळून लावण्यात अग्रेसर आहे. दोघांनी आज स्पष्टपणे भूमिका मांडली.
मोठी बातमी! पिंपरी चिंचवडचा कारभारी ठरला, रवि लांडगेंच्या नावार शिक्कामोर्तब
छगन भुजबळ म्हणाले, दोन्ही ठाकरे जसे एकत्र आले, तसे पवारही एकत्र यावेत. परंतु अशा काही चर्चा झालेल्या आम्हाला माहित नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे स्पष्ट केले आहे. माझ्याशी याबाबत कधीही अजितदादा बोलले नाहीत.मला याची कल्पनाही नाही. जे काही करायचे आहे, ते आम्हाला भाजपसोबत राहूनच करायचे आहे. विलिनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागणार आहोत. कारण आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारून निर्णय घ्यावा लागणार आहे.
जर सरकारमधून बाहेर पडायचे असेल आणि एनडीएबरोबर जायचे असेल, तर ती गोष्ट वेगळी आहे, असा विचार दादांनी केला असेल, असे आम्हाला कदापिही वाटत नाही, असे भुजबळ म्हणाले. आम्ही उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनित्रा पवार यांची निवड केली. आता त्यांचेच नेतृत्व आहे.
आता विलिनीकरणाबाबत त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल. राजकारणातील गोष्टी कधी घडतात, कधी घडत नाहीत, मात्र आता परिस्थिती बदलली आहे, नेतेही बदलले आहेत. शेवटी हा निर्णय सामुदायिक पद्धतीने घ्यावा लागेल.त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागे भाजपही उभे राहणे आवश्यक असल्याची भूमिका भुजबळांची आहे.
आम्हीही पक्षासाठी मेहनत घेतली-तटकरे
आम्ही स्वबळावर निवडणूक लढलो आणि जिंकलो. आता विलिनीकरणाबद्दल निर्णय, चर्चा सुरू होईल तेव्हा होईल. आम्हीही दीर्घकाळ अजित पवारांसोबत होतो. राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने घेतलेली भूमिका महाराष्ट्रात अंमलात आणण्यासाठी मेहनत घेतली आहे. आम्हीही दीर्घकाळ काम केले असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.
