‘…तर ठाकरे गटाची एकही जागा निवडून येणार नाही’; काँग्रेस नेत्याने डिवचलं
Sanjay Nirupam Vs Sanjay Raut : ठाकरे गट स्वबळावर लढल्यास एकही जागा निवडून येणार नसल्याचं दावा काँग्रेसचा नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागलं आहे. अशातच महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु झालं आहे. अशातच ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी (Sanjay Raut) 23 जागांचा प्रस्ताव काँग्रेस हाय कमांडकडे मांडला आहे. त्यावरुन आता महाविकास आघाडीत जागावाटपाचा मोठा तिढा उभा राहिला आहे. त्यावरच बोलताना संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर हा दावा केला आहे.
‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् अपमान’; सुप्रिया सुळेंनी मराठी प्रेम दाखवलं
संजय निरुपम म्हणाले, जागावाटपाबाबत आम्हाला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करावी लागणार आहे. मात्र राज्यात निवडणूक दिल्लीतील नेते नाहीतर स्थानिक नेते लढवणार आहेत. त्यामुले गल्लीबोळातल्या नेत्यांनीच राज्याचं नेतृत्व केलं आहे. मुख्यमंत्री आमदार, खासदार, लोकसप्रतिनिधी राहिलेले आहेत पण ठाकरे गटाचे नेते संजय राऊत एकही निवडणूक लढलेत काय? त्यांना निवडणूक काय असते ते माहिती आहे का? असा खोचक सवालही निरुपण यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांकडून असं बोललं गेलं नाही पाहिजे, ठाकरे गट-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये स्वबळावर निवडणूक लढवतील अशी क्षमता नाही. प्रत्येक पक्षाला एकमेकांचं सहकार्य पाहिजे. शिवेसना एकही जागा स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. काँग्रेसला ठाकरे गट आणि ठाकरे गटाला काँग्रेसची गरज असून तुम्ही अहंकार मनात ठेऊन बोलू नका, असा चॅलेंजिग अटिट्यूट ठेऊ नका, असाही सल्ला निरुपम यांनी दिला आहे.
Box Office: ‘डंकी’ने जगभरात पार केला 150 कोटींचा आकडा; भारतात कमावले ‘एवढे’ कोटी
आमची चर्चा सुरु आहे जागावाटपावर चर्चा झाल्यानंतर समोर येईलंच. निवडणुकीत दिल्लीचे नाहीतर लोकल नेतेच लढणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून अशी भाषा अॅटिट्यूड महाविकास आघाडीत चालत नाही. त्यांच्याकडे आता उरलेले चार ते पाच खासदार राहिलेत तेही राहतील की नाही माहित नाही, असा खोचक टोला निरुपम यांनी लगावला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा जागावाटपाचा मुद्दा तापू लागला आहे. याच मुद्द्यावर महाविकास आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. संजय राऊत 23 जागांची यादी घेऊन आमच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर इतक्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा निर्णय दिल्लीत होणार असल्याची माहिती दिली.