वंचितची संविधान सन्मान रॅली; प्रकाश आंबेडकर राहुल गांधींना बोलवणार?
Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान रॅलीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर परखडपणे भाष्य केलं आहे.
बावनकुळेंच्या ‘कसिनो’तील फोटोला नाना पटोलेंचा व्हिडिओ शेअर करत चित्र वाघ यांचे प्रत्त्युत्तर
प्रकाश आंबेडकर म्हणाले, संविधान के सन्मान में वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 25 डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर सभेच्या स्वरुपात ही रॅली होणार आहे. या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बोलवण्याचा विचार सुरु असून समितीमध्ये राहुल गांधींना निमंत्रित करण्याचा निर्णय झाल्यास राहुल गांधींनी औपचारिकपणे निमंत्रण देणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
…तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं; कपिल देवच्या आमंत्रणावरून राऊतांचा निशाणा
तसेच 2024 च्या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी हा विषय ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याबाबत जाणीव करुन दिली पाहिजे. आम्ही संविधानवादी असल्याने हेच संविधान आम्हांला पाहिजे हे सांगण्यासाठी रॅलीमध्ये आम्ही एकत्र येणार आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण द्यायचं असा निर्णय होणार आहे. त्यानंतर राहुल गांधींना रॅलीसाठी बोलावणार असल्याचंही आंबेडकर म्हणाले आहेत.
आमची ठाकरे गटाशी युती आहे. ज्यांच्याशी युती नाही त्यांनाच निमंत्रण द्यावं लागतं. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितचा काँग्रेससोबत युती करण्याचा विचार सुरु असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी संविधान रॅलीसाठी आल्यानंतर वंचित आणि काँग्रेसच्या युतीबाबतची खलबतं रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नामदेव जाधवांना काळं फासणं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भोवलं; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा!
संविधान सन्मान रॅली ही सभेच्या स्वरुपात होणार आहे. शिवाजी पार्कवर सभेच्या स्वरुपात सुरु होणार तिथेच सांगता होणार आहे. संविधान धोक्यात आहे असं म्हणत नाही पण ही रॅली संविधानाच्या सन्मानासाठी आहे. संविधानाच्या माध्यमातून, शोषितांना वंचितांना, ओबीसींना, सर्वधर्मीयांना न्याय मिळतो, त्यामुळे आम्ही या संविधानाच्या बाजूने असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे.
राज्यात सध्या आगामी निवडणुकांचं वेध लागलं आहे. निवडणुकीसाठी राज्यातल्या सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी युती झाल्याचं जाहीर स्पष्ट झालं आहे. मात्र, वंचित महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी नेमकं कोणत्या पक्षासोबत हातमिळवणी करणार? महाविकास आघाडीचा घटक पक्ष होणार का? याबद्दलची उत्तरं येत्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहेत.