Maharashtra Politics: ‘मी शरद पवारांच्या डोळ्यात डोळे घालून…’; अजितदादांच्या विधानाची चर्चा

  • Written By: Published:
Maharashtra Politics: ‘मी शरद पवारांच्या डोळ्यात डोळे घालून…’; अजितदादांच्या विधानाची चर्चा

Ajit Pawar on Sharad Pawar : गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत (NCP) बंडाळी केली आणि ते महायुतीत (Mahayuti) सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. लोकसभेला अजित पवारांनीत्नी सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं केलं होतं. त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं करणं ही माझी चुक होती, असं विधान केलं होतं. तर आज पुन्हा एकदा अजितदादांनी मोठं विधान केलं. मी शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोळ्यात डोळे घालूनही पाहू शकत नाही, असं ते म्हणाले.

मुंडेंना चीतपट करण्यासाठी पवारांचा डाव; आमदार गुट्टेंच्या जावयाने तुतारी फुंकली 

इंडिया टुडेने आज अजित पवारांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये फूट पडली तरीही घरात कसं वातावरण असतं? सणावाराला तुम्ही एकत्र येता का? समोरासमोर आल्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी गेल्यावर्षी जुलैमध्ये सरकारमध्ये सहभागी झालो. त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटलो, आम्ही गतवर्षी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. आमच्या येथे आमच्या काकी आहेत, सरोज पाटील. सरोज पाटील यांचे पती एन. डी. पाटील. ते जेव्हापासून राजकारणात होते, तेव्हापासून आमच्या विरोधात होते. पण आमच्या घरी याचये तेव्हा घरात राजकारण नसायचं. आजही आमच्या घरात राजकारण नाही असं ते म्हणाले.

मुंडेंना चीतपट करण्यासाठी पवारांचा डाव; आमदार गुट्टेंच्या जावयाने तुतारी फुंकली 

मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनही पाहू शकत नाही…
समजा तुमच्या समोर शेवटच्या रांगेत शरद पवार बसले आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल ? असा सवालही अजित पवार यांना आज विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ते माझे मोठे काका आहेत. मी त्यांना काय सांगणार? मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनही पाहू शकत नाही… मी मान खाली घालेन, असं ते म्हणाले.

शरद पवारांची साथ सोडल्याबद्दल खंत वाटते का? या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, जे काही झाले त्याचा विचार करणे आम्ही सोडून दिलं. आता आम्ही खूप पुढं गेलो. आम्ही आता भविष्याचा विचार करत आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्हाला काम करायचे आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. जुन्या गोष्टींचा विचार करण्यात आता अर्थ नाही, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube