इतिहास शिव्या-शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो; फडणवीसांचा टीकाकारांवर पलटवार
Dcm Devendra Fadnvis : इतिहास शिव्या शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवत असल्याचं सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी टीकाकारांना दिलंय. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सातत्याने फडणवीस टिकेचे धनी होत आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही नेत्याचं नाव न घेता उत्तर दिलंय. ते साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक राजकीय पक्षाचे नेते माझ्यावर टीका करीत असतात पण मी प्रतिक्रिया देत नाही. इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवत असतो, म्हणूनच मी टीकाकारांना प्रत्युत्तर देत नाही. जोपर्यंत मराठा समाजासाठीच्या योजना आहेत, या योजनांचं मुल्यमापन जेव्हा होईल तेव्हा योजना सुरु करणारा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे होते हे म्हणावं लागणार आहे. इतिहास शिव्या शापांना कधीच लक्षात ठेवत नाही तर इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
बांग्लादेशात मोठी घडामोड! टी 20 वर्ल्डकपसाठी क्रिकेट बोर्डाचे थेट लष्करप्रमुखांना पत्र
राज्यातील मराठा समाजातल्या तरुणांचा विकास केवळ भाषणांनी नाही तर काम करुन होत असतो. मराठा समाजबांधवांकडून वसतिगृहाची मागणी करण्यात आली, त्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास तत्काळ जागा वसतिगृह बांधून देणार असल्याचं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलंय. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ताही देण्यात आला असून 507 कोर्सेसमध्ये मराठा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फी राज्य सरकाकडून भरण्याचा निर्णय, मुलींसाठी तर मोफत शिक्षण देण्याच निर्णय घेण्यात आला असल्याचंही फडणवीसांनी या कार्यक्रमात स्पष्ट केलं आहे.
कंगाल पाकिस्तानवर कर्जाचा भार; स्टेट बँकेने जारी केली धक्कादायक आकडेवारी
दरम्यान, मराठा समाजाला न्याय मिळण्याची हीच आमचीही भूमिका असून 10 टक्के आरक्षणामुळे मराठा तरुणांना नोकऱ्यांमध्ये संधी मिळाली आहे. पोलिस भरतीत 10 टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांना जागा मिळाली आहे. पोलिस भरती प्रक्रिया 1 लाखांची असून त्यामध्ये 10 टक्के आरक्षणामुळे नोकरीत संधी मिळते. आरक्षणाबाबत मतमतांर असू शकतं, त्यामुळेचं शिंदे समितीच्या माध्यमातून आम्ही कुणबीच्या नोंदी शोधून काढल्या असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.