‘त्या’ अडीच वर्षांत कर्नाटकवाले आंदोलन करायचे पण आता..; DCM शिंदेंनी जुनं उकरुन काढलं
Dcm Eknath Shinde On Udhav Thackeray : अडीच वर्षांत कर्नाटकवाले आंदोलन करायचे पण आता कर्नाटकात सगळं काही सुरु असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जुनं उकरुन काढलंय. प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील एका कार्यक्रमात कर्नाटकातील व्यापारी वर्गाला संबोधित करीत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकातील परिस्थितीचा दाखला देत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केलीयं.
बजेटपूर्वीच सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा, 1 एप्रिलपासून लागू होणार UPS योजना
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू होण्याआधी वेगळी परिस्थिती होती. काश्मीरच्या लाल चौकात कोणत्याही क्षणी कुठूनही बॉम्ब यायचे, तिथं कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जात नव्हते. काश्मीरच्या लाल चौकात कोणाचीही जायची हिंमत नव्हती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथं तिरंगा फडकावलायं. तिथं आता गणेशोत्सव, सर्वच सण साजरे केले जात असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत तिलक वर्माचा पराक्रम; टी-20 क्रिकेटमध्ये ठोकल्या नाबाद 338 धावा
मी लढणारा आणि संघर्ष करणारा आहे, 2022 मध्ये आम्ही संघर्ष केला. कर्नाटकच्या लोकांनी पाहिलं आहे, अडीच वर्षांपूर्वी कर्नाटकातील सर्व दुकाने व्यापार सुरु करण्यासाठी लोकांना आंदोलने करावे लागत होती, पण आता आमच्या सरकारच्या काळात सर्व काही सुरु आहे. मोर्चे काढण्याची गरज लोकांना पडत नाही. कर्नाटकातील सर्व नियम आम्ही काढून टाकले असून कर्नाटकातील संस्कृतीला पुढे नेण्याचं काम आम्ही करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान, जो काम करेल तो पुढे जाईल. आमचं सरकार सर्वसामान्य जनतेसाठीच असून व्यापारी वर्गासाठीही आम्ही चांगलं काम करतोयं, त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेत असल्याचा शब्दही शिंदे यांनी यावेळी दिलायं.