“हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली? जनाची नाही तर मनाची..”, शिंदेंचे तिखट प्रत्युत्तर

“हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली? जनाची नाही तर मनाची..”, शिंदेंचे तिखट प्रत्युत्तर

Eknath Shinde Criticized Harshavardhan Sapkal : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट क्रूर शासक औरंगजेब याच्याशी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्‍यांची औरंगजेबाशी तुलना केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली असा सवाल शिंदे यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  यावेळी त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना थेट औरंगजेबाशी केली. औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला. औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे अशीच लोकांची भावना आहे.

फडणवीसही औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, दोघांचाही कारभार एकसारखा.. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित

यानंतर एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिंसाचारावरही भाष्य केले. नागपूरमध्ये काही जणांनी घरांना लक्ष्य केले. जाळपोळ केली. मालमत्तेचं नुकसान केलं. या दगडफेकीतून काही लोकं वाचली. पोलिसांवर दगडफेक झाली. काही लोक जखमी झाले. ही सगळी घटना पूर्वनियोजित होती असेच आता दिसत आहे. ज्या मोमिनपुरा भागात घटना घडली. तिथे याआधी वाहने पार्क केलेली असायची. पण काल तिथे वाहने नव्हती. मंदिरातील काही फोटोही यावेळी जाळण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवरही हल्ले करण्यात आले. पोलिसांवर दगडफेक करणे खरंच दुर्दैवी आहे. या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

काय म्हणाले होते सपकाळ

औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच आहे. औरंगजेब हा क्रूर शासक होता. सदा कदा औरंगजेब धर्माचा आधार घेत होता. सदा कदा धर्माचा आधार घेतात. मात्र संतोष देशमुख सारखे हत्या प्रकरणं, गरिबांच्या लेकीबाळी आज सुरक्षित नाही. दुर्देवाने महाराष्ट्रात हा प्रकार आज देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती.

देशात दंगली पेटवून २०२९ च्या निवडणुकीला सामोरे जायचं; नागपूर हिंसाचारावरून राऊतांचा थेट घाव

follow us
  • fb
  • instagram
  • youtube