नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा
Deputy Chief Minister Ajit Pawar’s meeting : कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ शुक्रवार (दि.28) रोजी दुपारी 2.30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी दिली आहे.
2029 ला निवडून आल्यापासून आ.आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)यांच्या अनमोल सहकार्यातून कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघाप्रमाणे कोपरगाव शहराची देखील विकसित शहराकडे वाटचाल सुरु झाली आहे. आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव (Kopargaon) शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वात महत्वाचा पाणी प्रश्न सोडवून रस्त्यांचा देखील विकास केला आहे. जनतेच्या सेवेसाठी नव्याने उभ्या राहिलेल्या ज्यांचे लवकरच लोकार्पण होणार आहे अशा अनेक शासकीय ईमारती कोपरगाव शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. अशा पद्धतीने कोपरगाव शहराच्या विकासाची घौडदौड सुरु असून विकासाचा वेग वाढवण्यासाठी व नागरीकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी होवू घातलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व कोपरगाव शहरातील जनतेच्या मनातील उमेदवार आ.आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या रूपाने दिला आहे. तसेच नगरसेवक पदासाठी देखील अनेक सुशिक्षीत व विकासाच्या संकल्पना असणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघ व कोपरगाव शहराच्या विकासाचे व्हिजन असलेल्या आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराच्या विकासाची लय कायम ठेवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आपल्या शिलेदारांना बळ देण्यासाठी येणार आहेत. त्यांचे मार्गदर्शन व त्यांचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी केले आहे.
