मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना माफ करणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील विविध शहरात आंदोलने देखील करण्यात आली आहे. तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना माफ करणार नाही. असा इशारा दिला. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरु आहे. या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) इफ्तार पार्टीचे (Iftar Party) आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी बोलताना मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हटलं आहे. शुक्रवारी नरिमन पॉईंट (Nariman Point) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दोन गटामध्ये भांडण लावणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला.
रमजान निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये सहभागी झालो. या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदानं सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो.
📍मरीन लाईन्स, मुंबई pic.twitter.com/kSck8pl6LB
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 21, 2025
यावेळी अजित पवार म्हणाले की, समता, त्याग, समर्पण आणि बंधुत्वाची भावना निर्माण करणारा हा पवित्र महिना आहे. रमजान केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. रमजान आपल्याला त्याग, एकता आणि बंधुत्त्वाची संदेश देतो. भारत विविधतेमध्ये एकतेच प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांनी जातींना एकत्र घेऊन समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्याला हाच वारसा पुढे न्यायचा आहे. असं इफ्तार पार्टींमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले.
#WATCH मुंबई: महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार ने अपने द्वारा आयोजित इफ्तार पार्टी में कहा, “…भारत विविधता में एकता का प्रतीक है…हमें किसी भी विभाजनकारी ताकतों के जाल में नहीं फंसना है। हमने अभी होली मनाई है, गुड़ी पड़वा और ईद आने वाली है, ये सभी त्यौहार हमें एक साथ… pic.twitter.com/71IFUtmEsz
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2025
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आपण नुकतीच होळी साजरी केली आहे. आता गुढीपाडवा आणि ईद येणार आहे. हे सर्व सण आपण एकत्र साजरे केले पाहिजे कारण हीच आपली ताकद आहे. तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या पाठीशी आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
मोठी बातमी! हमास लष्कर प्रमुख ओसामा तबाश ठार? इस्रायली सैन्याचा दावा
तसेच आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींना जो कोणी डोळा दाखवेल, दोन गटात भांडण लावून कायदा व्यवस्था बिघवडणार आणि कायदा आपल्या हातात घ्यायची गोष्ट करणार, तो जो कोणी असेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. माफ केलं जाणार नाही. असा इशारा इफ्तार पार्टीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.