‘2022 मध्ये CM झालो असतो तर, कदाचित…’; मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

  • Written By: Published:
‘2022 मध्ये CM झालो असतो तर, कदाचित…’; मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

Devendra Fadnavis : राज्यातील राजकीय वर्तुळात 2022 मध्ये अनेक नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं. भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली शिवसेना युतीचे सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवी उपमुख्यमंत्री झाले. त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे विधान केलं.

लोकसभेत काहीतरी मोठं घडणार, भाजप- काँग्रेसकडून खासदारांना व्हिप जारी 

उपमुख्यमंत्री होऊन जे नाव आणि प्रसिद्धी मिळाली, ती बहुधा मुख्यमंत्री होऊन मिळाली नसती, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्त वाहिनीशी संवाद संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. 2022 च्या सरकार स्थापनेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करताना मी बाहेरून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण मी यापूर्वीही मुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं. पण पंतप्रधान मोदी आणि माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मी उपमुख्यमंत्री बनून कंट्रोल करू शकतो, असा सल्ला दिला आणि त्यामुळे मी पक्षाचा निर्णय मान्य केला, असे ते म्हणाले.

Parbhani Violence संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर शहरात दंगल, 8 गुन्हे दाखल, 50 जणांना अटक… 

तो निर्णय योग्यच…
पुढं ते म्हणाले, जेव्हा पक्षाने मला सांगितले की आपल्या पक्षाचे नेते तुम्ही आहात, जर मोठ्या पक्षाचा नेता सरकारमध्ये नसेल तर तर सरकार नीट चालणार नाही आणि पक्षही व्यवस्थित चालणार नाही आणि जे त्यांनी सांगितले मी ते ऐकले. आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटते की हा योग्य निर्णय होता.

फडणवीस पुढे म्हणाले, पण, तेव्हा माझ्या मनात एक भाव होता, पण तो भाव हा नव्हता की, माझी अवनती का होतेय? तर लोक काय म्हणतील की, हा पदासाठी किती लालची माणूस आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आज उडी मारून लगेच उपमुख्यमंत्री झाला, हा भाव होता. पण, जेव्हा मी हा निर्णय घेतला आणि तो एक्सेप्ट केला, देशभरातून, कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून आणि जनतेतून मिळालेले कौतुक पाहून मला वाटते की मी मुख्यमंत्री झालो असतो तर मला इतके नाव आणि प्रसिद्धी मिळाली नसती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी त्या सरकारमध्ये अडीच वर्षे राहिलो आणि महत्त्वाची कामे करू शकलो, असं फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube