विनोद तावडे दोषी नाहीत, त्यांनी पैसे वाटले नाही, त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

  • Written By: Published:
विनोद तावडे दोषी नाहीत, त्यांनी पैसे वाटले नाही, त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawade) विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी केला. यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं. विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विषय हार्ड! गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बाझार विभागात 4 मराठी चित्रपटांचे होणार स्क्रिनिंग

अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला ही सलीम-जावेदची स्टोरी आहे, अशी टीका अशी टीका फडणवीस यांनी केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, विनोद तावडे हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. राजन नाईक हे आमचे उमेदवार आहेत. या दोघांवर हल्ला करण्यात आला आहे. तावडे यांच्याकडे कुठलेही पैसे नव्हते आणि त्यांनी पैसेही वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोठी बातमी ! रोहित पवारांच्या कारखान्याचा एमडीच पैशांसह पकडला; किती पैसे वाटले ? 

फडणवीस पुढे म्हणाले की, विनोद तावडे हे केवळ कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी प्लॅन करून त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. राजन नाईक यांनाही मारहाण करण्यात आली आहे. निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यावर आरोप होतात. त्यातलाच हा प्रकार आहे. उद्याच्या निवडणुकीतील पराभव लपविण्यासाठी महाविकास आघाडीच्या एकोसिस्टमने कव्हर फायरिंग केले, अशी टीका फडणवीस यांनी केली. या प्रकरणात विनोद तावडे दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही, वाटले नाहीत, असं फडणवीस म्हणाले.

काल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, मागील बाजुने दगड मारला, तर तो मागे लागायला पाहिजे. तो समोर कसा लागला? मागून फेकलेला दगड गोल फिरून समोरुन लागणे, अशाप्रकारचा दगड फक्त रंजनीकांतच्या चित्रपटात फेकला जाऊ शकतो, असा टोला फडणवीसांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube