देशाच्या येणाऱ्या पिढीला प्रशिक्षित करण्याचं काम भारतीय जैन संघटना करतेय ; देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis In National Convention Of Indian Jain Association : पुण्यातील (Pune) बिबवेवाडी येथे भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रिय अधिवेशन पार पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मी जेव्हा जैन समाजाच्या कार्यक्रमात जातो, तेव्हा मी नेहमी म्हणतो की हा केवळ एका समाजाचा कार्यक्रम नाही, तर हा देशाच्या जीडीपीचा कार्यक्रम आहे. कारण भारताच्या जीडिपीमध्ये जैन समाजाची असणारी मोठी हिस्सेदारी आहे. आपल्याला फाईव्ह ट्रिलीयन इकोनॉमी तयार करायची आहे, त्याचा रस्ता आपल्याच माध्यमातून जातो, असं देखील देवेंद्र फडणवीस जैन समाजाला (Indian Jain Association) संबोधित करताना म्हटले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भगवान महाविरांनी जे आपल्याला तत्व दिले आहेत, त्यामध्ये दानाचं देखील उल्लेख आहे. जैन समाज जितकं कमावतो, तितकंच दान देखील करतो, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. पाणी फाऊंडेशन आणि जैन संघटनेने पाण्यासंदर्भात जे काम केलंय, ते उल्लेखनीय असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. हजारो लोकांच्या जिवनात आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान आणि भारतीय जैन संघटनेने दिलाय. माझं श्रेय फक्त ‘आगे बढो, हम साथ है’ इतकंच आहे.
“मीडियासमोर वक्तव्य करून निर्णय होत नाही”, गृह खात्याच्या मागणीवर भाजपाचं प्रत्युत्तर
महाराष्ट्र पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त अवर्षणग्रस्त आहे. 2020 मध्ये केंद्र सरकारने पूर्ण भारताचं एक वॉटर टेबलचं रिपोर्ट कार्ड तयार केलंय. या रिपोर्टमध्ये अलार्मिंग परिस्थिती समोर आलीय. महाराष्ट्र केवळ एक असं राज्य होतं, ज्यामध्ये वॉटर टेबलची पातळी वर आलेली होती. याचं श्रेय पाणी फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटना, नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांना जातं. आमिर खान यांनी सुरू केलेल्या स्पर्धेतून पाण्याचे चॅम्पियन्स वर आलेत, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
शिक्षेसोबत मूल्य देणं गरजेचं असतं. आज 99 टक्के कामाचे नसून आत्मकेंद्रित पिढी गरजेची नाही, तर मूल्यांमधून व्यक्ती उभा राहतो. मला समाजाने काहीतरी दिलंय, मला ते परत करायचं आहे, हे देखील गरजेचं आहे. देशाच्या येणाऱ्या पिढीला एका प्रकारे प्रशिक्षित करण्याचं काम आपण भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून करत आहोत. त्यामुळे मी जीडीपीचं अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.