मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनीच पवार साहेबांकडे माणसं पाठवली; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनीच पवार साहेबांकडे माणसं पाठवली; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde : उद्धव ठाकरे म्हणतात की, मला पवार साहेबांनी सांगितलं की, तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायला हवं. पण उद्धव ठाकरेंनीच पवार साहेबांकडे माणसं पाठवली की, माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचवा असं सांगितलं. म्हणून पवारांनी त्यांचंन नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं. असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर या प्रक्रियेतील लोक माझ्याशी या विषयावर बोलले आहेत. मी योग्यवेळ आली की, त्यांची नाव सांगेल. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी कोणाची इच्छा होती. असा प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे. एका वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. ( Eknath Shinde Criticize Udhav Thackrey on CM post in MVA government )

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं देखील म्हणाले की, माझं नाव मुख्यपदासाठी चर्चेत होत. कारण बाळासाहेबांनाच शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहिजे होता. नाहीतर मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेचा उमेदवार कोण असावा याचं काय करायचं होतं. मात्र निवडणुकांपासून कायम केवळ अवघड जबाबदाऱ्या घेण्यासाठीच मी असायचो. तर ज्या व्यक्तीची जबाबदारी संपली की, त्यांचं काम त्यांच्या दृष्टीने संपलेलं असतं अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली आहे.

त्याचबरोबर आता पर्यंत राज्याच ज्या काही अवघड निवडणुका झाल्या पूर आले महापूर आले तिकडे मीच गेलो. माझं तेवढंच काम आहे. तेव्हापासून त्यांनी तेच केलं. तेव्हा देखील मी आणि आमच्या आमदारांची महाविकास आघाडीमध्ये जाण्याची तयारी नव्हती. पण आम्ही बाळासाहेबांचा आदेश मानणारे लोक त्यामुळे पक्षप्रमुखांचा आदेश देखील आम्ही मानला. आमच्या प्रमुखांची इच्छा म्हणून आम्ही ते मान्य केलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube