घोडं कुठेच अडलं नाही, आपलं घोडं सरळ चालतंय; गुलाबराव पाटलांचं खातेवाटपावर विधान

घोडं कुठेच अडलं नाही, आपलं घोडं सरळ चालतंय; गुलाबराव पाटलांचं खातेवाटपावर विधान

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) आणि खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटेना. हाच तिढा सोडवण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या काही नेत्यांसोबत दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं शिंदे गटात नाराजी आहे. अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता ऱखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाष्य केलं. कुणीही अर्थमंत्री बनला, तरी आपण काम करण्याची क्षमता ठेवावी, सत्तेत तीन वाटेकरी असल्यानं काही उणीवा राहणार आहेत, असं ते म्हणाले. (Gulabrao Patil on Cabinet expansion and finance ministry)

आज गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार घोडं नेमकं अडलं कुठं? असा प्रश्न विचारताच ते म्हणाले की, घोडं कुठेच अडलं नाही. आपलं घोडं सरळ चालतंय. काही गोष्टींचा निर्णय व्हायचा आहे. सत्तेत तीन वाटेकरी आहेत. राज्य चालवणं हे संसारासारखचं आहे, त्यामुळं काही उणीवा राहणार आहेत. या उणीवा चर्चेनंतर सुटतील. यासाठी वेळ लागतो. याचा अर्थ असा नाही की, घोडं कुठंतरी अडलं किंवा काहीच होणार नाही. येत्या एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार नक्कीच होईल. त्यात सर्वांना न्याय मिळेल याची मला खात्री असल्याचं पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे गृहखात्याला लागलेला कलंक, सुषमा अंंधारेंची जहरी टीका… 

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नको, अशी माझी नाही तर शिवसेना आमदारांची मागणी आहे, असं बच्चू कडू म्हणाले होते. याविषयी विचारले असता पाटील म्हणाले,हे बघा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याने विचार केला पाहिजे की, वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांनी मान्य मान्य करायचो असतो. निर्णय घेण्यासाठी वरच्या स्तरावर नेते बसले आहेत. त्यामुळं कोणी मंत्री बनला किंवा कुणी अर्थमंत्री बनला तरी आपण कामं करण्याची क्षमता ठेवली पाहिजे. आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात कसे काम करायचे ते आपल्या हातात आहे. मंत्री कुणीही बनू द्या. आपणही आमदार आहोत, आपल्यालाही जनतेने निवडून दिले आहे. आपलं काम कसं नाही होणार? आपलं काम करत राहायचं. ऑन अजित दादा कामे होत नाही आरोप आमची कामे होत होती. मंत्र्यांची कामे होत होती. आदारांची कामे होत नव्हती.

दरम्यान, अजित पवारांना मविआत असतांना शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला नव्हता, असं शिवसेनेचे आमदार आरोप करत असतात. यावरही पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, त्यावेळी मंत्र्यांची कामे होत होती, आमदारांची कामे होत नव्हती त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आता आमचे दाढीवाले मुख्यमंत्री आहेत, असं पाटील यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube