Rajan Salvi : सरकारला माझा शाप…साळवी असं का म्हणाले? पाहा नेमकं काय म्हणाले…

Rajan Salvi : सरकारला माझा शाप…साळवी असं का म्हणाले? पाहा नेमकं काय म्हणाले…

रत्नागिरी : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी बोलावलं आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या मागोमाग आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढ होग्त असल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या कुटुंबाला देखील एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे.

२० मार्च रोजी चौकशीकरिता बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, मागील २ महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घराची देखील पाहणी एसीबीकडून करण्यात आली. तसेच, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. गेल्या २ महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत.

या सरकारला माझा शाप आहे : साळवी

एसीबीच्या नोटीशीबद्दल साळवी म्हणाले की, “जे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यांना सरकारी संस्थांच्या माध्यमातून नोटीसा पाठवल्या आहेत. परंतु जे लोक भाजपात किंवा शिंदे गटात गेले त्यांना नोटिसा येत नाहीत. तिकडे गेले की सर्व नेते वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतात आणि आम्हाला दोषी ठरवलं जातं.

Shahaji Bapu Patil : बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होता; शहाजी पाटील यांचा निशाणा

देशात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. सर्व केंद्रीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्यामुळे आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून या सरकारला माझा शाप आहे. दरम्यान, साळवी म्हणाले की, “तुमचं टार्गेट मी आहे आणि तुम्ही मला नोटीस पाठवली तर माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका. तसेच माझ्या भागातले स्थानिक ठेकेदार आणि सरपंचांना त्रास देऊ नका.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube