‘निर्णय बदला नाहीतर बंडखोरी परवडणार नाही’; अप्पासाहेब जगदाळेंचा थेट पवारांना इशारा

  • Written By: Published:
‘निर्णय बदला नाहीतर बंडखोरी परवडणार नाही’; अप्पासाहेब जगदाळेंचा थेट पवारांना इशारा

Indapur Politics : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) भाजपमधून (BJP) शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे इंदापूर तालुक्यात शरद पवार (Sharad Pawar) गटाची ताकद वाढली. ते इंदापूरमधून तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटातील नेते आणि पदाधिकारी अस्वस्थ झालेत. या नेत्यांनी आज परिवर्तन मेळावा घेऊन थेट शरद पवारांना (Sharad Pawar) इशारा दिला.

मोठी बातमी! नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये भीषण अपघात, 2 अग्निवीरांचा मृत्यू 

तुम्ही तुमचा निर्णय बदला. नाहीतर बंडखोरी परवडणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात मोहोळ उठेल, असा इशाराच या नेत्यांनी दिला.

हर्षवर्धन पाटील यांना पक्षात प्रवेश दिल्याने शरद पवार गटाचे नेते अप्पासाहेब जगदाळे नाराज आहेत. त्यांनी पाटील यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. ते केवळ विरोध करूनच थांबले नाही तर त्यांनी थेट परिवर्तन रॅली घेण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानुसार जगदाळे यांनी आज हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाची ज्या ठिकाणी सभा जाली, त्याच ठिकाणी मोठी सभा घेऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना थेट इशारा दिला. यावेळी जगदाळे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

मोठी बातमी! नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये भीषण अपघात, 2 अग्निवीरांचा मृत्यू 

जगदाळे म्हणाले की, आज एवढी लोकं इथं जमली आहेत. इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ज्याच्यात धमक असते, तो काम करतो, सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता, असं परवाच्या सभेत काही जण म्हणत होते. तो अदृश्य हात काय असतो? कधी काम केलं? कुठं काम केलं? अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांची जगदाळेंनी खिल्ली उडवत लोकसभेत कुणी प्रामाणिकपणे काम केलं हे कळायला हवं, असं ते म्हणाले.

2014 ची निवडणूक झाली, 2019 मध्येही मी चार वेळा साहेबांकडे चकरा मारल्या. पण 2014, 2019 ला देखील आमचा विचार झाला नाही. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं. आता आपलं काही खरं नाही, असं आम्हाला वाटतंय. आज आम्ही अपक्ष उभं राहम्याचा विचार करतोय, असं जगदाळे म्हणाले.

पुढं ते म्हणाले, आम्ही काय करायचं हे जनतेनं आम्हाला सांगायचं आहे. उद्याची निवडणूक इंदापूरच्या परिवर्तनाची आहे. तुमची साथ हवी आहे. शरद पवार आणि सुप्रिया ताईंना विनंती… या जनतेवर प्रेम असेल तर त्यांना निर्णय बदलावा लागेल. इंदापरूची बंडखोरी परवडणारी नाही, हे मोहोळ महाराष्ट्रात पसरणार आहे. त्यामुळं तुम्ही घेतलेला निर्णय बदलणार की नाही हे उद्या जाहीर करा, असंही जगदाळे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube