जीआर आणि जाहिराती बघता आता कर्मचाऱ्यांचे पगारही…; रोहित पवारांचे मोठे विधान

  • Written By: Published:
जीआर आणि जाहिराती बघता आता कर्मचाऱ्यांचे पगारही…; रोहित पवारांचे मोठे विधान

Rohit Pawar : ऐन विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) तोंडावर सत्ताधारी महायुती सरकारने (Mahayuti) लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojna) घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने निर्णयांचा धडाकाच लावला आहे. आजवर सरकारने घेतलेले हे सर्व निर्णय राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याची टीका विरोधक करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयावरून महायुतीवर जोरदार टीका केली.

पारोळ्याची जागा शरद पवार घेणार? सतीश पाटलांनी सांगितलं विधानसभेचं गणित 

मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, जीआर आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही? अशी दबक्या आवाजाच चर्चा सुरू असल्याचं रोहित पवार म्हणाले.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी महायुती सरकावर जोरदार निशाणा साधला. रोहित पवारांनी लिहिलं की, केवळ निवडणुका समोर ठेऊन मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, जीआर आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही? अशी चर्चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. या महिन्याच्या पगाराची तर आशासुद्धा सर्वांनी सोडली आहे, असं ते म्हणाले.

काकांनंतर अजित पवारही ॲक्शन मोडमध्ये, काँग्रेसला देणार धक्का, 3 आमदारांचे इनकमिंग? 

रोहित पवारांनी पुढं लिहिलं की, सहकारी पक्षांची आर्थिक बेशिस्त आणि हवेतल्या घोषणांना कंटाळून गुरूवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अर्थमंत्री तर पहिल्या दहाच मिनिटांत उठून निघून गेले. त्यामुळं डबघाईला आलेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची होत असलेली वाताहात बघून दिल्लीतील गुजरातचे नेते मात्र मनोमन खूष झाले असतील, असा जबरदस्त टोलाही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून लगावला.

दरम्यान, रोहित पवारांनी केलेल्या टीकेला आता महायुतीमधील नेते काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube