आधी ‘मनस्मृती’चं दहन, मग ‘बाबासाहेबांची’ प्रतिमा फाडली, आता माफीनामा! A To Z प्रकरण काय?

आधी ‘मनस्मृती’चं दहन, मग ‘बाबासाहेबांची’ प्रतिमा फाडली, आता माफीनामा! A To Z प्रकरण काय?

Jitendra Awhad : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मनस्मृतीमधील काही श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचं बोललं जात आहे. त्यावरुन एसआरईटीकरडून हरकती मागवण्यता येत आहेत. या निर्णयाविरोधात विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात असून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) आज महाडच्या चवदार तळे इथ मनस्मृती जाळून आंदोलन केलं. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (Dr. Babasaheb Ambedkar) प्रतिमा फाडल्याचा आरोप अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) करण्यात आला. त्यानंतर खुद्द जितेंद्र आव्हाडांनी जाहीरपणे माफी मागितलीयं.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नेमकं काय?
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानूसार आता तिसरीपासून ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार जाहीर करण्यात आलायं. यामध्ये विद्यार्थ्यांनी गीतेमधील अध्याय तसेच मनाचे श्लोक पाठांतर करण्याबाबतची शिफारस करण्यात आलीयं. या धोरणानूसार आता शालेय अभ्यासक्रमात मनस्मृतीचे श्लोक विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या निर्णयाला विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात असल्याचं दिसून येत आहे. संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांसारख्या विविध संघटनांकडून हरकती नोंदवल्या जात आहेत.

Melinda French Gates : महिलांच्या हक्कांसाठी मेलिंडा फ्रेंच गेट्स $1 अब्ज रुपये देणार

ऐतिहासिक महाड चवदार तळ्यावर आंदोलन :
मनस्मृतीच्या श्लोकांचा समावेश होत असल्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळ्यावर जात पाणी प्राशन केलं. यावेळी छोटेखानी सभेत ते भाषणात म्हणाले, 1927 साली मनोवादी आंदोलनामध्ये लढा देणाऱ्या इतर जातीच्या लोकांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. मनस्मृतीमध्ये विश्वाची निर्मीती झाल्यापासून झोपा काढणे, क्रोध, द्वेष, निंदा या गोष्टी मनुने स्त्रियांना दिल्या आहेत. काही निवडक लोकं महाराष्ट्राला बदनाम करीतअसून संविधान बदलण्याचे कारनामे सुरु असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केलं.

मनस्मृतीसह बाबासाहेबांची प्रतिमा असलेला फोटो फाडला :
महाड चवदार तळ्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केल्यानंतर मनस्मृती फाडून शैक्षणिक धोरणाला विरोध केलायं. यावेळी त्यांनी मनस्मृती फाडत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला फोटोदेखील त्यांनी फाडल्याचं दिसून आलं.

हार्दिक-नताशाच्या मित्राकडून घटस्फोटावर मोठा खुलासा; म्हणाला, दोघं अनेक महिन्यांपासून…

नाक घासून माफी मागा नाहीतर…
जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृतीसोबतच बाबासाहेबांची प्रतिमा असलेला फोटो फाडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलायं. ठाण्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा फोटो फाडून निषेध व्यक्त केलायं. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळ्यावरील बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून संबंध देशाची माफी मागावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलीयं. आव्हाडांनी माफी मागितली नाहीतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराच मिटकरींनी दिलायं.

फोटो फाडल्यानंतर आव्हाड काय म्हणाले?
मनुस्मृती दहन करण्यासाठी आम्ही महाडला आलो, तेव्हा मनुस्मृती लिहिलेलं पुस्तक फाडताना बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षातच आलं नाही. त्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले. यामागे आमचा कोणताही दुसरा हेतू यात नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दामुन केलं नाही. आमच्या विरोधकांना काय राजकारण करायचं आहे, ते करतील ते खूप काही मागणी करतील. पण, त्यावर मी अधिक काही बोलणार नसल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज