“भाजपाला सोडा, आमच्याबरोबर या” प्रकाश आंबेडकरांची CM शिंदेंना थेट ऑफर

“भाजपाला सोडा, आमच्याबरोबर या” प्रकाश आंबेडकरांची CM शिंदेंना थेट ऑफर

Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (Lok Sabha Election 2024) आणि महायुती या दोघांच्याही जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ही बैठक सुरू होण्याआधीच आघाडीचे सर्वेसर्वा अॅड.  प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी थेट राज्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच ऑफर दिली आहे. माझी एकनाथ शिंदे यांना ऑफर आहे की त्यांनी भाजपला सोडावे आणि आमच्याबरोबर यावे, अशा स्पष्ट शब्दांत आंबेडकरांनी शिंदे यांना ऑफर दिली आहे.

Prakash Ambedkar : ‘ती’ वेळ आणू नका’ भाजपची ‘बी टीम’ म्हणणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आंबेडकरांचा इशारा

यानंतर पत्रकारांनी त्यांना शिंदे खरंच तुमच्याबरोबर येतील का असा प्रश्न विचारला. त्यावर आंबेडकर म्हणाले,  माहित नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. मग उद्धव ठाकरे कुठे जातील? असा दुसरा प्रश्न पत्रकारांनी विचारला. उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आम्ही कुठं काय म्हटलं आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील फुटीनंतर तुम्ही आता मध्यस्थी करत आहात का? असा आणखी एक प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर आंबेडकर म्हणाले असे काही नाही. आम्ही असे काही सुचवले नाही आणि आम्ही असे काही करत सुद्धा नाही. मी फक्त इतकंच म्हणालो की एकनाथ शिंदे यांना जर आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांचं वेलकम करतो. अट फक्त इतकीच आहे की त्यांनी भाजपला सोडावं.

आम्ही महाविकास आघाडीबरोबर चर्चा करणार

महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीचं निमंत्रण आम्हाला आलं आहे. आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आमचे मुद्दे आम्ही त्या बैठकीत मांडणार आहोत. त्यांचं 35 जागांवर समझोता झाला असं वक्तव्य मध्यंतरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्याचीही माहिती आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत.

Prakash Ambedkar ; आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज