महायुतीचं जागावाटप फायनल! 48 पैकी 46 मतदारसंघाचा तिढा सुटला, 2 जागांचा तिढा कायम

महायुतीचं जागावाटप फायनल! 48 पैकी 46 मतदारसंघाचा तिढा सुटला, 2 जागांचा तिढा कायम

Mahayuti seat sharing : भाजपने (BJP) राज्यातील 20 लोकसभा उमेदवारांची (Loksabha Election) यादी जाहीर करुन बराच कालावधी उलटला तरी आत्तापर्यत जागावाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. मात्र, आता महायुतीती जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 जागा निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर 2 जागांवर अद्यापही तिढा कायम आहे.

सुप्रियाताईंच्या समर्थनात अजितदादांच्या भावजयी मैदानात; ‘माहेरवाशीण’वरुन सडेतोड उत्तर 

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. असे असतानाही शिवसेना आणि अजित पवार गटाला नाममात्र जागा देऊन आपल्या वाट्याला अधिकाधिक जागा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न केला.

एकनाथ शिंदे गटाच्या जागा
कल्याण
दक्षिण मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
उत्तर पश्चिम मुंबई
पालघर
मावळ
रामटेक
कोल्हापूर
हातकंणगले
बुलढाणा
शिर्डी
हिंगोली
यवतमाळ वाशीम

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागा
बारामती
शिरूर
नाशिक
रायगड
परभणी (महादेव जानकर )

कोणत्या दोन जागेवरून रस्सीखेच? 
तर उर्वरित सर्व जागा भाजपला मिळाल्या आहेत. महायुतीमध्ये नाशिक आणि ठाण्यातील जागांसाठी अजूनही रस्सीखेच सुरू आहे. भारतीय जनता पक्ष ठाण्याच्या जागेसाठी जोर लावत आहे. कारण ठाण्यात भाजपची मोठी ताकद आहे. तर ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची असल्याने सेना सोडण्यास तयार नाही. ठाणे आणि नाशिक वगळता संभाव्य जागावाटप स्पष्ट झाले आहे.

नाशिकची जागा तिन्ही पक्ष आपल्याकडे काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या हेमंत गोडसे हे शिंदे गटाचे खासदार तिथे आहेत. मात्र, त्या जागेवर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. त्यामुळं हेमंत गोडसे यांनी काल ठाण्यात शक्ती प्रदर्शन करत नाशिकची जागा खेचून आणण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे आग्रह धरला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube