कुणाचा राजीनामा मागण्याची गरज नाही; महादेव जानकर ठामपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी, राजकीय नेत्यांनाही का फटकारले ?
Mahadev Jankar On Sarpanch Santosh Deshmukh murder case: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरणात रोखठोकपणे आपली भूमिका मांडली. >धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांचा राजीनामा मागण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय त्यावरून राजकारण करणाऱ्यांना नेत्यांनी त्यांनी फटकारले आहे.
एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अन् अॅक्शनचा आवाज; ‘फिल्मसिटी’तर्फे अनोख्या फॅम टूरचे आयोजन
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जानकर म्हणाले, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून निषेध करतो. जे आरोपी आहेत, त्यांना योग्य जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, या मताचा मी आहे. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे. यात जातीय तेढ निर्माण होऊ नये. बीडमध्ये ओबीसीविरुद्ध मराठा असा नॅरेटिव्ह सेट होत आहे. ते होऊ नये. या प्रकरणात आता सीआयडीने लक्ष घातले आहे. पोलिस खात्यालाही आमच्यासारख्या लोकांच्या स्टेटमेंटमुळे बाधा येऊ नये. जे सत्य आहे. ते बाहेर यावं. ज्यांनी केलं आहे. त्यांना शिक्षा व्हावी. यात राजकीय लोकांनी जास्त हस्तक्षेप करू नये.
नगर – मनमाड हा रस्ता संशोधनाचा विषय, आमदार सत्यजित तांबेंचा खोचक टोला
मराठवाड्यात मनोज जरांगे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी सुरेश धस यांना पुढे केले जात आहे का ? या प्रश्नावर महादेव जानकर म्हणाले, जातीवाद शाहू-फुले-आंबेडकरांच्या राज्यात जनता मान्य करत नाही. हे समतवादी, पुरोगावादी राज्य आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा नॅरेटिव्ह पसरविणे योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात आरोपींना शिक्षा होईल, असे सांगितले आहे. गृहखाते त्यांचे काम करेल. जे आरोपी आहेत, त्यांना नक्की शिक्षा झाली पाहिजे. कुणाचा राजीनामा मागण्याची गरज नाही. प्रत्यक्षात संबंध आहे ? त्यासाठी गृहखात्याने त्याच्यावर चौकशी करावी ? आपण लगेच्या लगेच कुणाचा राजीनामा मागण्यास अर्थ नाही. ते स्वत: तेथे होते का ? हा ज्या, त्या पक्षाचा प्रश्न आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनामाचा अजित पवार यांनी निर्णय घ्यावा. गृहखात्याने आपल्या ट्रकने या प्रकरणाचा तपास करावा. याचा राजीनामा घ्या, त्याचा राजीनामा घ्या हे बोलणे योग्य नाही, असे मला वाटत आहे.