नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हात संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्व्हे करत तो राज्य सरकारला सादर सुद्धा करण्यात आला आहे. परंतु अदयाप देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचे काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनानंतर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची कोंडी झालीय. आपण जर सत्यजित तांबेंना जाहीर पाठिंबा दिला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आपल्यावर कारवाई करू शकतात. सत्यजित तांबेंच्या मित्रांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला होता. सत्यजित तांबेंच्या बाजूने […]
पुणे : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी माेठी भरती जाहीर केली आहे. एमपीएससीची इतिहासातील ही सर्वात माेठी (8,169 पदे) भरती असणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उप निरीक्षक (PSI), दुय्यम निबंधक (Sub Registrar), तांत्रिक सहायक (Technical Assistant) , कर सहायक […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा संपल्यानंतर आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी कंबर कसलीय. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील शिंदे गट आणि भाजपच्या सर्व आमदार, खासदारांची संयुक्त बैठक घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत संबोधित केलंय. बैठकीसाठी सर्व आमदार,खासदारांनी उपस्थित राहुन […]
नाशिक : नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituancy) महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील(Shubhangi Patil) आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Styajeet Tambe) यांच्यात थेट लढत आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्याकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी उतरले असून त्यांचे समर्थकही आज गावोगावी भेटीगाठी देत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु असतानाच […]
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खुली ऑफर मिळाली आहे. ठाकरे गटाच्या आमदाराने पंकजा यांना शिवसेनेत येण्यासाठी साद घातलीय. पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून आलेल्या या ऑफरवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिलीय. पंकजा मुंडेंना शिवसेनेकडून मिळालेल्या ऑफरवर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडेचे आणि भाजपचे 22 वर्षापासूनचे […]