‘तुम्ही इथे कसे काय?’, गोंधळलेल्या पत्रकारांच्या प्रश्नाला फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर

‘तुम्ही इथे कसे काय?’, गोंधळलेल्या पत्रकारांच्या प्रश्नाला फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या वेळी फडणवीस उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पत्रकारांनीही त्यांना हाच प्रश्न विचारला यावर फडणवीसांनीही तत्काळ उत्तर पत्रकारांच्या मनातील संभ्रम दूर केला.

त्याचं झालं असं, आज डॉ. गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. तसे पाहिले तर याआधी शिंदे यांच्या उपस्थितीत जे पक्ष प्रवेश सोहळे झाले आहेत त्यावेळी फडणवीस कधी उपस्थित असल्याचे दिसले नाहीत. मग आताच का?, असा प्रश्न उपस्थितांना पडला.

राष्ट्रवादी भवन आमचचं, स्वत:हून ताब्यात द्या नाहीतर.., दीपक मानकरांचा आक्रमक पवित्रा

या प्रवेश सोहळ्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना शिवसेनेतील पक्ष प्रवेशावेळी तुम्ही इथे कसे काय? असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेना आणि भाजप ही एक भावनिक युती आहे. नीलम ताई आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत म्हणूनच मी त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी येथे उपस्थित आहे. त्यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश केला नसून हिंदुत्वाला पुढे नेत असलेल्या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे गटाच्या प्रमुख महिला नेत्या 

गोऱ्हे या उद्धव ठाकरे गटाच्या एकनिष्ठ म्हणून ओळखल्या जात होत्या. पक्षातील प्रमुख महिला नेत्या म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तसेच त्याआधी भाजपबरोबर युती तुटल्यानंतरच्या काळात त्यांनी ठाकरे गटाची बाजू समर्थपणे सांभाळली होती. विधानपरिषदेतील उपसभापती म्हणूनही त्यांचे काम चांगले चालले होते. असे असतानाही त्या आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांत वादाची स्थिती निर्माण झाली होती. विधानपरिषदेत गोऱ्हे या उपसभापती असूनही बोलू देत नाहीत अशी तक्रार ठाकरे गटातील आमदारांची होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube