महाविकास आघाडीच्या एकजुटीला हादरे ! आधी सावरकर आता मोदींच्या डिग्रीवर धुसफूस..

महाविकास आघाडीच्या एकजुटीला हादरे ! आधी सावरकर आता मोदींच्या डिग्रीवर धुसफूस..

Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष एकत्र  (Maharashtra Politics) येताना दिसत आहेत. मात्र, महाराष्ट्रात विरोधकांच्या या एकतेला काही दिवसांतील राजकीय घडामोडींमुळे जबरदस्त हादरे बसले आहेत. आधी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ उडाला. महाविकास आघाडीत खटके उडायला लागले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.

मोदींची डिग्री बनावट असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. तर राज्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी परस्पर विरोधी मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलायला लागली आहेत.

Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?

मोदी आडनावासंदर्भात 2019 मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लागलीच राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की मी माफी मागायला काही सावरकर नाही. यानंतर महाविकास आघाडीचा घटक असलेल्या ठाकरे गटाने राहुल गांधी यांच्या या भूमिकेचा आणि वक्तव्याचा विरोध केला होता.

या वक्तव्यामुळे आघाडीतील वातावरण इतके बिघडले की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आयोजित केलेल्या जेवणाच्या कार्यक्रमात ठाकरे गटातील कुणीही सहभागी झाले नाही. या बिघडत चाललेल्या वातावरणाची चाहूल राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी लागली. त्यांनीही लागलीच हालचाली करत राहुल गांधी यांना सावरकरांबाबत काही विधाने करणे टाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आता हे प्रकरण बऱ्यापैकी शांत झाल्याचे दिसत आहे. कारण, यानंतर आतापर्यंत राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांच्या बाबतीत वक्तव्य केले गेलेले नाही.

https://letsupp.com/maharashtra/trupti-desai-will-contest-election-against-supriya-sule-31474.html

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील हा वाद शमत नाही तोच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीचे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने केंद्रीय सूचना आयोगाचा निर्णय रद्द करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मोदी यांची डिग्री बनावट असल्याचा आरोप केला. तसेच या डिग्रीची तपासणी करण्याचीही मागणी केली. त्यानंतर या प्रकरणाचे लोण महाराष्ट्रातही पोहोचले. येथे मात्र हा मुद्दा विरोधकांतील बेकी दाखवून गेला.

खासदार संजय राऊत यांनी मोदींवर जोरदार टीका केली. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नेमके उलट मत व्यक्त केले. राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की नरेंद्र मोदींनी संसदेच्या गेटवर त्यांची डिग्री चिटकवावी. म्हणजे, देशाचे कायदा निर्माते आणि देशातील नागरिकांना त्यांची योग्यता काय आहे हे माहिती होईल.

तर दुसरीकडे अजित पवार म्हणाले, की सन 2014 आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदींना लोकांनी त्यांच्या डिग्रीवरून नाही तर त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्या करिश्म्यावर निवडून दिले आहे. पीएम मोदींच्या डिग्रीपेक्षाही देशात बेरोजगारी आणि महागाई या मोठ्या समस्या आहेत.

Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?

ठाकरेंची कोंडी 

दरम्यान, या सगळ्या राजकारणात ठाकरे गटाची कोंडी होत आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आता शांत बसू शकत नाहीत. कारण, लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत शांत राहून चालणार नाही. काहीच बोलले नाहीत तर हक्काची मतेही फुटण्याची भीती आहे. त्यामुळे आता ठाकरे यांना या मुद्द्यावर बोलणे गरजेचे आहे. त्यांनी याची चुणूक मालेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत दाखवून दिले. या सभेत उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत राहुल गांधी यांना सल्ला देत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बोलू नये असे सांगितले होते.

भाजपवरही हल्लाबोल गरजेचा

या सगळ्या राजकारणात भाजपवर टीका करून आपले राजकारण जिवंत ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण, भाजपमुळेच उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली. त्यांच्यामुळेच पक्षात फूट पडली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र बचावात्मक पवित्र्यात दिसत आहे. काँग्रेसचे नेते मात्र टीका करण्यापलीकडे फारसे काही बोलत नसल्याचे दिसत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube