देवेंद्र फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले, “ते जिंकले, हरले किंवा..”

Devendra Fandnavis on Sharad Pawar : राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज नसतो. याचा प्रत्यय राज्यातील जनता सातत्याने घेत आहे. आताही राज्याच्या राजकारणात एक अनपेक्षित घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मला शरद पवारांच्या अनेक गोष्टी आवडतात. या वयातही ते काम करता ही गोष्ट कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या कार्यशैलीचं कौतुक केले. शरद पवारांबद्दलच्या (Sharad Pawar) अनेक गोष्टी मला आवडतात. पण काही गोष्टी अशाही आहेत ज्या मी स्वीकारत नाही. पण मी त्यांचं सातत्याने कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात.
पुण्यातील अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल होणार; बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
लव्ह जिहाद वास्तविक, काही घटनांनी चिंता वाढली
यानंतर फडणवीसांनी लव्ह जिहाद, व्होट जिहाद या मुद्द्यांवरही भाष्य केलं. तरुण मोठ्या संख्येने आयसिसमध्ये का भरती होत आहेत. अल्पसंख्याकांचा कट्टरतावाद हे वास्तव आहे. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. लव्ह जिहादप्रमाणेच महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान व्होट जिहादचा एक प्रकार घडला होता असे फडणवीस यांनी सांगितले.
काही जिल्ह्यांत प्रेमसंबंधांच्या नावाखाली शोषणाच्या घटना घडल्या आहेत. अनेक जिल्ह्यांत लव्ह जिहाद ही वास्तविकता आहे. या मुद्द्यावर बोललं तर कधीकधी अतिशयोक्ती वाटते. परंतु, काही ठिकाणी ही सत्य परिस्थिती आहे. अशी प्रत्येक घटना चिंताजनक नसली तरी काही घटनांनी मात्र चिंता निश्चितच वाढली आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.